[ad_1]
वाचाः
एअरटेल, व्होडाफोन-आयडियाने ३ मे पर्यंत वैधता वाढवली
Oppo A92s चे खास वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.५७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. तर रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे. स्क्रीनचे आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. फोनमध्ये स्क्रीनच्या पुढे एक पंचहोल कटआऊट देण्यात आला आहे. ज्यात ड्युअल फ्रंट कॅमेरे आहेत. डिव्हाईसमध्ये २.० गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ८०० ५जी चिपसेट देण्यात आला आहे. फोनला ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम या दोन पर्यायात खरेदी करता येवू शकते. हा फोन लेटेस्ट कलरओएस ७ वर चालतो. तो अँड्रॉयड १० ओएसवर आधारीत आहे. या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच १८ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये साइडला एक फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
वाचाः
शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी किसान रथ अॅप लाँच
या फोनमध्ये एकूण ६ कॅमेरे आहेत. म्हणजेच चार रियर आणि दोन फ्रंटला आहेत. रियरवर सोनी IMX586 सेन्सर, अपर्चर एफ/१.७ एलईडी फ्लॅशस ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स देण्यात आला आहे. फोनच्या पुढे सोनीचा IMX471 सेन्सर सह १६ मेगापिक्सल आणि अपर्चर एफ/२.० मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. या फोनचे वजन १८४ ग्रॅम आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ५जी, ड्युअल ४जी, व्हीओएलटीई, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाईप सी आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
वाचाः
रियलमीचे Narzo 10 आणि Narzo 10A भारतात २१ एप्रिलला लाँच होणार
[ad_2]
Source link