oppo a31 2020 : ओप्पो A31चा आज सेल, ‘या’ ऑफर्स मिळणार – oppo a31 2020 goes on sale starting today triple cameras, 4,230mah battery: price in india

[ad_1]

नवी दिल्लीः ओप्पोने नुकताच लाँच केलेला ओप्पो ए३१ (Oppo A31) चा आज पहिला सेल आहे. ओप्पोने भारतात या फोनला २७ फेब्रुवारी रोजी लाँच केले होते. ओप्पोचा भारतीय बाजारातील हा लेटेस्ट फोन आहे. Oppo A31 (2020) स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, यात तीन रियर कॅमेरे, वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनमध्ये ग्रेडिअँट फिनिश बॅक पॅनेल आणि फिंगरप्रिंट सेन्सरचा सेट दिला आहे.

ओप्पोचा आजपासून सेल सुरू होणार असून या फोनची किंमत ११ हजार ४९० रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ४९० रुपये, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९० रुपये आहे. परंतु, सध्या केवळ ४ जीबी रॅम फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. ओप्पोचा ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन भारतात मार्च महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दोन्ही प्रकारातील फोन ऑनलाइनसह ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध केले जाईल, असा कंपनीने दावा केला आहे. हे स्मार्टफोन ब्लॅक आणि फँटेसी व्हाइट या दोन रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे.

हा फोन ऑनलाइनवरून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, टाटा क्लिक, स्नॅपडील आणि पेटीएम मॉलवरून विकला जाणार आहे. या फोन खरेदीवर एक्सचेंज ऑफर आणि विना व्याजावर ईएमआय सह यस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ५ टक्के तत्काळ कॅशबॅक दिला जाणार आहे.

Oppo A31 (2020) ची खास वैशिष्ट्ये


या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो २०:९ दिला आहे. हा फोन ९ पाय अँड्रॉयडवर आधारित आहे. या फोनला कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो पी३५ प्रोसेसर दिला आहे. ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम या दोन प्रकारात हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये तीन सेन्सर दिले आहेत. प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. पुढच्या बाजुला वॉटरड्रॉप नॉच आणि यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४२३० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

बापरे! पाकिस्तानला गुगल – फेसबुकही वैतागले

जगात सर्वाधिक विकला जाणारा ‘हा’ स्मार्टफोन

लीप वर्षानिमित्त गुगलनं साकारलं खास डुडल



[ad_2]

Source link

Leave a comment