एकाच ॲप मधून इयत्ता १ ली ते १० वी विद्यार्थ्यांचा अभ्यास शक्य, Online Guru an Educational App इ.१ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त शैक्षणिक अॅप आहे . Online Guru an Educational App हे Google Play Store वर सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे.

Online Guru या शैक्षणिक ॲप् चे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त माननीय श्री. संदीप खोत साहेब यांच्या हस्ते दिनांक १ /९/२०२१ रोजी करण्यात आले

Online Guru ॲप मध्ये समाविष्ट बाबी
- ई लर्निंग व्हिडीओ – सेमी सह सर्व विषयांचे ई-लर्निंग व्हिडिओ
- ऑनलाइन टेस्ट – इ.१ ली ते इ. १० वी मधील विद्यार्थ्यांना विषयांचा अभ्यास तपासण्यासाठी विषय निहाय ऑनलाईन टेस्ट उपलब्ध
- आजचा घरचा अभ्यास – ऑनलाईन शिक्षणासाठी उपयुक्त इयत्ता इ.१ ली ते इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांना Online Guru Educational App या ॲप मधील आजचा घरचा अभ्यास टॅब मध्ये घटक समजावून देणारा ई लर्निंग व्हिडीओ व त्यावर आधारित लेखी प्रश्न असणारा घरचा अभ्यास दररोज सकाळी ७.०० वाजता उपलब्ध होतो. आजच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थी मागील तारखांचा देखील अभ्यास एका क्लिकवर सहज मिळवू शकतात

Online Guru ॲपची वैशिष्ट्ये
- Online Guru इ.१ ली ते इ. १० वी एका अॅपवरून सर्व इयत्तांचे एकाच घरातील विद्यार्थी अभ्यास करू शकतात.
- ॲप मध्ये सुरुवातीला एकदा इयत्ता सीलेक्ट केल्यानंतर पुन्हा ऍप सुरू केल्यानंतर त्याची इयत्तेचा अभ्यास ई लर्निंग व्हिडीओ ऑनलाइन टेस्ट विद्यार्थ्यांना इत्यादी गोष्टी दिसतात.
- दरवेळी लॉग इन करण्याची, पासवर्ड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
- एका क्लिकवर विद्यार्थी इयत्ता बदलू शकतात .
- आकर्षक व विद्यार्थी वयोगट लक्षात घेऊनकरून डिझाईन केलेली रंगसंगती
- विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार व मोबाईलच्या उपलब्धतेनुसार आपल्या इयत्तेचे ई लर्निंग व्हिडिओ ऑनलाईन टेस्ट व आजचा घरचा अभ्यास तसेच मागील घरचा अभ्यास देखील सहज करू शकतात .
- ऑडिओ,इमेजेस, व्हिडीओ, गुगल फॉर्म अशा विविध माध्यमांचा वापर
- ॲप मध्ये ऑनलाइन टेस्ट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना बरोबर उत्तरे चुकलेली उत्तरे यांसहित मिळालेले गुण लगेच कळणार .
- विद्यार्थ्यांना घरच्या अभ्यासाची नोटिफिकेशन दररोज मिळणार
- गुगल प्ले स्टोअर वर सर्वांसाठी मोफत उपलब्ध
Online Guru Educational App खालील Google play Store च्या Icon वर क्लिक करून हे ॲप डाऊनलोड इन्स्टॉल करा.