oneplus 8 : वनप्लस ८ सीरिजचे स्मार्टफोन १० मिनिटात ‘आऊट ऑफ स्टॉक’ – oneplus 8, oneplus 8 pro sold out within minutes during launch sale

[ad_1]

नवी दिल्लीः वनप्लस ८ सीरिज अंतर्गत नुकतेच लाँच झालेल्या OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro स्मार्टफोनला लोकांची पसंती असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात महाग फोन असतानाही ग्राहकांनी या फोनला पसंती दिली आहे. या फोनचा पहिला लिमिटेड सेल नुकताच पार पडला. पहिल्या सेलमध्ये अवघ्या काही मिनिटात हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाल्याची माहिती 9to5Google च्या एका रिपोर्टमधून उघड झाली आहे. वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो ची ऑर्डर घेण्यात आली. केवळ १० मिनिटात हे फोन आऊट ऑफ स्टॉक झाले. या दोन्ही फोनचा मर्यादीत स्टॉकचा सेल इस्टर्न टाइम झोन (EDT) मध्ये करण्यात आला होता. वनप्लस डॉट कॉमवर ओपन सेल २९ एप्रिलपासून नॉर्थ अमेरिकेत सुरू होणार आहे. भारतात वनप्लसचे हे दोन्ही स्मार्टफोन कधी लाँच होणार आहेत, याविषयी कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

वाचाः
आयफोन SE 2 लाँचिंगनंतर ‘या’ जुन्या आयफोनची विक्री बंद

OnePlus 8 Pro ची किंमत आणि
फीचर्स

वनप्लस ८ प्रो मध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले, क्यूएचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसोबत येतो. डिस्प्लेत एक कन्फर्ट झोन फीचर आहे. या फोनमध्ये दिलेला सर्वात बेस्ट डिस्प्ले असल्याचा कंपनीचा दावा आहे. या डिस्प्लेला मॅटए प्लस सर्टिफिकेट मिळाले आहे. वनपल्स ८ प्रो डिस्प्ले १० बिट कलर डेप्थ सपोर्ट करते. फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तसेच ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, ३एक्स टेलिफोटो कॅमेरा व एक कलर फिल्टर कॅमेरा दिला आहे. वनप्लस ८ प्रोमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पीकर्स असल्याने डॉल्बीचा फील येणार आहे. या फोनमध्ये ४५१० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा फोन केवळ ३० मिनिटात ५० टक्के चार्ज होऊ शकतो. वनप्लस ८ प्रो कंपनीच्या ऑक्सिजन ओएसवर चालतो. या फोनमध्ये न्यू डार्क थीम, डायनामिक वॉलपेपर, लाइव्ह कॅप्शन यासारखे नवीन फीचर मिळतील. वनप्लस ८ प्रोच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८९९ डॉलर म्हणजेच ६८ हजार २०० रुपये आहे. तर १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेज फोनची किंमत ९९९ डॉलर म्हणजेच ७५ हजार ८०० रुपये आहे.

वाचाः
ऑनरची ३० सीरिज लाँच , पाहा किंमत-फीचर्स

वनप्लस ८ चे खास फीचर्स व किंमत

या फोनमध्ये ६.५५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. वनप्लसने या फोनमध्ये फ्लूड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी ओआयएस आणि ईआयएस, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक मायक्रो सेन्सर सह ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. स्टोरेजसाठी २५६ चा पर्याय देण्यात आला आहे. फोनमध्ये ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये हॅप्टिक व्हायब्रेशन २.० टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. OnePlus 8 ची किंमत व वैशिष्ट्ये वनप्लस ८ च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ६९९ डॉलर म्हणजेच ५३ हजार रुपये, तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७९९ डॉलर म्हणजेच ६० हजार ६०० रुपये

वाचाः
मोटो Razrचा भारतात ‘या’ दिवशी पहिला सेल



[ad_2]

Source link

Leave a comment