♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

NISHTHA प्रशिक्षण , कोर्स लिंक  वेळापत्रक व सूचना 

NISHTHA प्रशिक्षण कोर्स लिंक  वेळापत्रक व सूचना 

दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे.

देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.० FLN (National Initiative For School Head’s and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण १२ घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे. ते खालील प्रमाणे

एकूण १२ सामान्य अभ्यासक्रमावर आधारित घटकसंचाचे (मोड्यूल्स) चे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. यामध्ये सदरचे सामान्य अभ्यासक्रमावरील प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहे.

NISHTHA प्रशिक्षण सुचना खालीलप्रमाणे,

सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने सर्व

१) शिक्षकांनी DIKSHA ॲपवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

2)  सदरच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक ३० दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण सामान्य अभ्यासक्रमवार आधारित ४ व दिनांक ०१ एप्रिल २०२२ पासून सदरचे सर्व १२ कोर्सेस (मोड्यूल्स) पुन्हा उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

3) शिक्षकांसाठी सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम हा मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.

4)  सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये DIKSHA अ‍ॅपवर दर ३० दिवसांसाठी एकूण ४ मोड्यूल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेले आहे.

सदर प्रशिक्षणासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत असून ज्यांनी यापूर्वी प्रत्यक्षामधील निष्ठा प्रशिक्षण तसेच ऑनलाईन स्वरुपामधील प्रशिक्षण यामध्ये काम केले आहे. अशा प्रती जिल्हा २ SRP यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती संदर्भ क्रमांक ३ नुसार करण्यात आलेली आहे.

• तसेच कार्यरत आय. टी. विषय सहायक यांना तांत्रिक कामाची जबाबदारी सोपविण्यात याकरिता आवश्यक सविस्तर उद्बोधन आयोजित करण्यात येईल. आलेली आहे.

• याचबरोबर सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे जो प्रशिक्षणार्थी कोर्स वर आधारित मुल्यांकनामध्ये किमान ७०% गुणांकन प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे, याची नोंद घ्यावी.

• तसेच वेळापत्रकानुसार उपलब्ध करून देण्यात आलेला कोर्सेस (मोड्यूल्स) ला सर्व प्रशिक्षणार्थी यांनी जॉईन करून ठेवणे गरजेचे आहे. विहित ३० दिवसांच्या मुदतीच्या ५ दिवस पूर्वीस प्रशिक्षणार्थी कोर्स (मोड्यूल) जॉईन करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.

तरी उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने ऑनलाईन स्वरूपामध्ये निष्ठा प्रशिक्षण DIKSHA ॲपच्या माध्यमातून प्राथमिक शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पूर्ण करावे यासाठी सर्व शाळा व शिक्षकांना याबाबत अवगत करण्यात यावे. तसेच आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी, जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनांप्रमाणे निर्धारित वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शक्य होईल.

निष्ठा प्रशिक्षण कोर्स वेळापत्रक

अ.क्रकालावधीकोर्स क्रमांक व नाव
1दि. ०१ जानेवारी ते ३० जानेवारी,२०२२१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.
२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.
३. अध्ययनार्थ्यांचे आकलन : मुल कसे शिकते?
४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग
2दि. ३१ जानेवारी ते १ मार्च, २०२२५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन
६. पायाभूत भाषा आणि साक्षरता.
७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण
८. अध्ययन मुल्यांकन
3दि. ३१ जानेवारी ते १ मार्च, २०२२९. पायाभूत संख्याज्ञान
१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर
११. शालेय शिक्षणातील पुढाकार 
१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

खालील प्रमाणे याचे वेळापत्रक आहे त्यातील घटकासमोर त्या course ची जॉइनिंग लिंक दिली आहे. क्लिक केले की app ला फॉरवर्ड होईल.

खालील  घटकाच्या नावावर क्लिक करून आपण दीक्षा ॲप मध्ये सदर घटकापर्यंत पोहोचू शकता

1. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.

2. क्षमताधिष्टीत शिक्षणाकडे वाटचाल.

3 अध्ययनार्थ्यांचे आकलन : मुल कसे शिकते?

4. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग.

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा