Mothers Day: ‘मदर्स डे’ निमित्त सॅमसंगची १५ मे पर्यंत जबरदस्त ऑफर्स – samsung india rolls out mother’s day offers for galaxy z flip, s20 series smartphones

[ad_1]

नवी दिल्लीः येत्या १० मे रोजी जगभरात मदर्स डे साजरा केला जाणार आहे. मदर्स डे निमित्त सॅमसंग कंपनीने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये गॅलेक्सी झेड फ्लिपसोबत ११ हजार ३०० रुपयांची इयरबड्स केवळ ३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२० सीरिजवर सुद्धा कंपनीने ऑफर आणली आहे. मदर्स डे ऑफर अंतर्गत गॅलेक्सी एस२० सीरिजवर सॅमसंग केअर प्लसवर ५० टक्के डिस्काउंट दिला जात आहे. डिस्काउंटनंतर ही सेवा केवळ १ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे.

वाचाः
करोनाः पुणे आणि कटकच्या ITI ने करून दाखवले

१५ मे पर्यंत मिळणार ऑफर
सॅमसंगची मदर्स डे निमित्त सुरू केलेली ऑफर ही ४ मे पासून सुरू करण्यात आली आहे. ही ऑफर १५ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान, गॅलेक्सी झेड फ्लिपवर सॅमसंगची ही ऑफर ११ मे पर्यंत देणार आहे. तर गॅलेक्सी एस२० सीरिजवर ही ऑफर १५ मे पर्यंत सुरू राहणार आहे.

वाचाःमोटोरोलाची भन्नाट ऑफर, एका फोनवर दुसरा ‘फ्री’

गॅलेक्सी झेड फ्लिपची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ४२५ पीपीआय आणि २१.९:९ चे आस्पेक्ट रेशियो सोबत ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डायनामिक अमोलेड इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये देण्यात आलेला सेकंडरी कव्हर डिस्प्ले १.०६ इंचाचा आहे. फोनमध्ये मेन डिस्प्ले पंच होल डिझाईन सोबत देण्यात आला आहे. यात १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बाहेरच्या बाजुला फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल प्रायमरी कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्यात ओआयएस सपोर्ट आणि ८ के झूम देण्यात आला आहे.

वाचाःलॉकडाऊनः फ्लिपकार्टवर साडी आणि ‘हे’ सर्वाधिक सर्च

गॅलेक्सी एस सीरिजची वैशिष्ट्ये
या सीरिज अंतर्गत कंपनीने तीन स्मार्टफोन लाँच केले होते. या तिन्ही फोनमध्ये इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. याची साईज वेगवेगळी आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२० मध्ये ६.२ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन ३२००x१४४० पिक्सल आणि १२०एचझेडचे रिफ्रेश रेट आहे. गॅलेक्सी एस२० प्लस मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. गॅलेक्सी एस२० अल्ट्रामध्ये ६.९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे.

वाचाःशाओमीच्या ‘या’ स्मार्टफोनची ३ कोटींहून अधिक विक्री

[ad_2]

Source link

Leave a comment