[ad_1]
खालील अॅप्लिकेशन्स वापरून आपल्या फोनमधील कॉन्टॅक्ट नंबर किंवा ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांच्या नंबरनं सर्च करून पैसे पाठवू शकता. त्याशिवाय क्यूआर कोड स्कॅन करूनसुद्धा अकाऊंट व्हेरिफाय करून व्यवहार करता येतात. काही अॅप्सविषयी…
० गुगल पे
हे अॅप्लिकेशन आधी तेझ या नावानं ओळखलं जायचं. गुगलचं हे अॅप्लिकेशन यूपीआय पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशन्समध्ये वरच्या क्रमांकावर आहे. कारण हे अॅप जास्त प्रमाणात वापरलं जातं. ६.७ कोटी पेक्षा अधिक ग्राहक दर महिन्याला हे अॅप्लिकेशन वापरतात. वापरायला सोपं म्हणजे युजरफ्रेंडली असल्याचं अनेक वापरकर्ते नमूद करतात. या अॅप्लिकेशनने एसबीआय, आयसीआयसीआय, अॅक्सेस आणि एचडीएफसी या चार प्रमुख बँकांबरोबर टाय-अप केला आहे. यामध्ये वॉलेटचा पर्याय उपलब्ध नसल्यानं ‘केवायसी’ करायची गरज भासत नाही. मोबाइल नंबर बरोबर लिंक असलेले बँक अकाऊंट अॅड करून हे अॅप्लिकेशन वापरता येतं.
० फोन पे
हे अॅप्लिकेशन २०१६ साली बंगळुरु स्थित एका कंपनीनं सुरु केलं. सर्वांच्या परिचित असलेल्या फ्लिपकार्ट या कंपनीनं फोन पे हे अॅप विकत घेतलं आहे. फोन पे या अॅप्लिकेशनची यूपीआय पेमेंटसाठी येस बँक बरोबर पार्टनरशिप आहे. जिओ मनी, फ्री चार्ज आणि एअरटेल मनी यांची इ-वॉलेट यामध्ये अॅड करून या वॉलेट्समध्ये सहजपणे व्यवहार करता येतात.
० पेटीएम
अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर सर्वाधिक डाऊनलोड अॅप्लिकेशन्समध्ये हे अॅप्लिकेशन अग्रस्थानी आहे. भारतामध्ये डिजिटल पेमेंटची सुरुवात करण्यामध्ये पेटीएम या अॅप्लिकेशनचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. या अॅप्लिकेशनमध्ये ‘यूपीआय’ बरोबरच इ-वॉलेटचीसुद्धा सुविधा उपलब्ध आहे. ‘रूपे’ व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे पेटीएम पेमेंट बँक बरोबर लिंक करता येतं.
० फ्रीचार्ज पेमेंट अॅप
फ्रीचार्ज हे यूपीआय पेमेंट अॅपसुद्धा सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशन्सपैकी एक आहे. या अॅप्लिकेशन्समध्ये मिळणाऱ्या सवलती आणि ऑफर्समुळे हे अॅप अधिक लोकप्रिय आहे. यामध्ये ‘केवायसी’ डॉक्युमेंट्स सबमिट करून यातील मोबाइल वॉलेटचासुद्धा लाभ घेता येऊ शकतो.
० पे झेप बाय एचडीएफसी बँक
या अॅप्लिकेशनमध्ये यूपीआय आणि इ-वॉलेट या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. कॅशबॅक ऑफर्स आणि पेमेंट करताना मिळणाऱ्या सवलतींमुळे हे अॅप्लिकेशन लोकप्रिय ठरत आहे. यातील खास सुविधा म्हणजे ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी यामध्ये व्हर्च्युअल डेबिट कार्ड उपलब्ध आहे.
० पॉकेट्स बाय आयसीआयसीआय बँक
यूपीआय आणि इ-वॉलेट अशा दोन्ही सुविधा असलेलं हे अॅप्लिकेशन सर्वात आधी आयसीआयसीआय बँकेनं उपलब्ध करून दिलं आहे. यामध्ये उपलब्ध असलेले व्हर्च्युअल डेबिट कार्ड ग्राहकांना रेग्युलर डोमेस्टिक डेबिट कार्ड म्हणूनसुद्धा वापरता येतं. या अॅप्लिकेशनमध्ये देखील व्यवहार करताना ग्राहकांना विविध ऑफर्स दिल्या जातात.
ऑनलाइन व्यवहार करताना लक्षात ठेवायचे मुद्दे
० आपला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस हा अनोळखी लोकांसोबत शेअर करू नये.
० आपल्या मोबाइलची स्क्रीन शेअर होऊ शकते, अशी अॅप्लिकेशन्स इन्स्टॉल करणं टाळा. अगदीच गरज भासल्यास अशा अॅप्लिकेशन्सचं काम झाल्यावर ती लगेच अनइन्स्टॉल करा.
० कोणत्याही मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर किंवा क्यूआर कोडवर खात्री न करता क्लिक करू नये.
० यूपीआय अॅप्लिकेशन्स ऑफिशिअल अॅप स्टोअरवरूनच इन्स्टॉल करा आणि ते अपडेटेड ठेवा.
[ad_2]
Source link