Microsoft founder : बिल गेट्सने खरेदी केले ४६०० कोटींचे जहाज – microsoft founder bill gates purchased rs 4600 crore luxury super yacht aqua

[ad_1]

नवी दिल्लीः जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी सुपर याट (Super yacht) म्हणजे अलिशान जहाज खरेदी केले आहे. या जहाजाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे लिक्विड हायड्रोजनवर चालते. या जहाजाची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसेल. या जहाजाची किंमत तब्बल ४६०० कोटी रुपये इतकी आहे. सुट्टी घालवण्यासाठी बिल गेट्स यांनी हे जहाज खरेदी केले आहे.

जवळपास ३७० फूट लांब असलेल्या Aqua जहाजात पाच डेक आहेत. यात १४ पाहुणे आणि ३१ क्रू मेंबर, एक जिम, एक योगा स्टुडिओ, ब्युटी रूम, मसाज पार्लर आणि स्विमिंग पूल बनवण्यात आले आहेत. या जहाजात २८ टनाचे दोन व्हॅक्युम सील्ड टँक लावण्यात आले. ते मायनस २५३ ड्रिग्री सेल्सिअसच्या तापमानावर उर्जा देण्यासाठी हायड्रोजन भरले जाऊ शकते. सुट्टी घालवण्यासाठी या आधी ते भाड्याने जहाज घेत असत. बिल गेट्स यांचे नवीन जहाज हे २०२४ पर्यंत तयार होऊ शकते. हायड्रोजन होणार असल्याने ते केवळ पाण्याचे उत्सर्जन करेल. आणि इको फ्रेंडली असणार आहे. जहाजाच्या मागे सनबाथ किंवा स्विमिंग साठी एक लोअर लाँज एरिया दिला आहे. तर वरच्या बाजुला आउटडोल डायनिंग साठी इंटरनेटिंग स्पेस दिला आहे. जहाजात रात्री थंडी वाजू नये किंवा खोली गरम करण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यात येणार नाही. तर जेल फ्युल्ड फायर बॉल्सचा वापर करण्यात येणार आहे.

मागच्या बाजुला डेकमधील एका भागात पुल दिला आहे. तो सरळ समुद्राशी जोडण्यात आलेला आहे. या ठिकाणी १४ लोकांचा मनोरंजन करण्यासाठी होम थियटर दिले आहे. या जहाजाला गेल्यावर्षीच्या २५ ते २८ डिसेंबर पर्यंत पोर्ट हरक्युलिस मधील मोनॅको याट शोमध्ये लाँच केले होते. सुपरयाट एक वेळा लिक्विड हायड्रोजन फुल भरल्यानंतर ते जवळपास ६४३७ किमी पर्यंत अंतर कापू शकते. म्हणजेच अटलांटिक क्रॉस करून ते न्यूयॉर्क ते साउथहँप्टन पर्यंत पोहोचू शकते. या जहाजाचा वेग ३२ किलोमीटर प्रति तास इतका आहे. या जहाजात दोन रूम, दोन व्हीआयपी स्टेट रूम, एक पव्हेलियन दिला आहे.

महिंद्राची वेगवान कार; ५ सेकंदात १००KM वेग

Auto Expo: ‘कार’नामा पाहाच; ‘मसाज’ करणारी कार!



[ad_2]

Source link

2 thoughts on “Microsoft founder : बिल गेट्सने खरेदी केले ४६०० कोटींचे जहाज – microsoft founder bill gates purchased rs 4600 crore luxury super yacht aqua”

Leave a comment