Microsoft co founder : समाजसेवा करण्यासाठी बिल गेट्स यांचा राजीनामा – microsoft co founder bill gates is stepping down from the companys board of directors

[ad_1]

नवी दिल्लीः मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (वय ६४) यांनी बोर्ड ऑफ संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. समाजसेवा करण्यासाठी बिल गेट्स यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिला असला तरी ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्यासोबत सल्लागार म्हणून काम करीत राहणार आहेत. बिल गेट्स यांनी राजीनामा दिल्याची माहिती कंपनीने शुक्रवारी मध्यरात्री दिली आहे. जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीत बिल गेट्स यांचे दुसरे स्थान आहे. बिल गेट्स यांना जागतिक स्तरांवर समाजसेवा करायची आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, मायक्रोसॉफ्ट नेहमी माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग राहिले आहे. मला दोन्ही कंपन्यांवर अभिमान आहे. आगामी आव्हानाचा मी सकारात्मक पद्धतीने विचार करतो. त्यासाठी मी तयार आहे, असे बिल गेट्स यांनी राजीनाम्यानंतर म्हटले आहे. बिल गेट्स यांनी १९७५ साली पॉल एलन यांच्यासोबत कंपनीची स्थापना केली होती. वर्ष २००० पर्यंत ते कंपनीचे सीईओ या पदावर कार्यरत होते. २००८ मध्ये त्यांनी समाजसेवा करण्यासाठी बिल अँड मेलिंड गेट्स फाउंडेशन या संस्थेची स्थापणा केली होती. २०१८ मध्ये संस्थेने जवळपास ३५५ कोटी रुपये दान केले होते. ते २०१४ पासून कंपनीच्या संचालक पदावर कार्यरत होते.

बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले, बिल गेट्स यांच्यासोबत काम करणे ही अभिमानाची बाब आहे. बिल गेट्स हे सल्लागार म्हणून कंपनीसोबत राहणार असून त्याचा कंपनीला फायदाच होणार आहे.


सॅमसंग Galaxy M30s चा आज पहिला सेल

शाओमीचा वायरलेस चार्जर १६ मार्चला लाँच

विवोचा Z1X स्मार्टफोन ४ हजार रुपयाने स्वस्त

BSNL आणि MTNL चे खासगीकरण नाहीः केंद्र सरकार



[ad_2]

Source link

Leave a comment