[ad_1]
या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्थेत एकाचवेळी १० हून अधिक कर्मचारी काम करणाऱ्या कार्यायलात एकत्र येऊ नये. जर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही तर ५ हजारांचा दंड आकारला जाईल.

टाइम्स फॅक्टच्या एका वाचकाने आम्हाला आमचा व्हॉट्सअॅप नंबर 85270 01433 वर हा एक मेमोरेंडम पाठवून याची खरी माहिती जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे?
आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशाच्या चार राज्यात करोना व्हायरसमुळे सुट्टीच्या घोषणासंबंधीचे कोणतेही स्पष्टीकरण जारी केले नाही.
प्रेस कॉन्फ्रेन्स ब्युरो म्हणजेच पीआयबी ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हॉट्सअॅपवर व्हायरल असलेला मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे.
PIB ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, करोना व्हायरसमुळे राज्यातील सुट्टी जाहीर करण्यावरून एक ऑफिस मेमोरेंडम व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून या प्रकारचे कोणतेही स्पष्टीकरण जारी करण्यात आले नाही.
Claim: An office memorandum regarding declaration of holidays in states, in wake of #Coronavirus is widely getting… https://t.co/GAfRJ1VokB
— PIB Fact Check (@PIBFactCheck) 1584108844000
निष्कर्ष
करोना व्हायरसमुळे देशातील चार राज्य महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि सिक्कीममध्ये आरोग्य कुटुंब कल्याणकडून कोणतीही सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. व्हॉट्सअॅपवर शेअर होत असलेली माहिती खोटी आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
Fake Alert: शाहीन बागच्या नावानं पॉर्न व्हिडिओ शेअर
[ad_2]
Source link