इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 44
विषय – गणित

थोडं समजून घेऊ
इष्टिकाचिती
इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे आयताकार आहेत आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत. इष्टिकाचितीला
चौकोनी चिती देखील म्हणतात.
ज्या इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे ही समान चौरसाकृती असतात, त्या इष्टिकाचितीला घन म्हणतात.
चौकोनी सूची
तळाचे पृष्ठ चौकोनी असून उभी पृष्ठे त्रिकोणी असणाऱ्या आकाराला चौकोनी सूची म्हणतात.
त्रिकोणी चिती
तळाच्या व वरच्या पृष्ठभागाचा आकार त्रिकोणाकृती असून बाजूंचे पृष्ठभाग हे आयताकृती असतात अशा आकृतीला त्रिकोणी चिती म्हणतात.
त्रिकोणी सूची
सर्व पृष्ठे त्रिकोणी असणाऱ्या आकाराला त्रिकोणी सूची म्हणतात.
लक्षात ठेवा
चितीचे तळाचे व वरचे पृष्ठ सारखे असून बाजूची पृष्ठे आयताकार असतात तर सूचीचे वरचे टोक सूईसारखे असून बाजूची पृष्ठे त्रिकोणाकृती असतात. चितीच्या व सूचीच्या तळाच्या आकारावरुन त्या आकृतीचे नाव ठरते.
वृत्तचिती (दंडगोल )
वर्तुळाकार तळ असलेला उभा डबा तुम्ही पाहिलेला आहे. डबा हे वृत्तचितीचे सर्वपरिचित उदाहरण आहे. डबा बंद असेल तर ही बंदिस्त वृत्तचिती असते. या आकाराचा तळ वर्तुळाकार असल्याने याला वृत्तचिती म्हणतात.
आइस्क्रीमचा कोन, विदुषकाची टोपीसारख्या आकाराला शंकू म्हणतात. बंद नसलेल्या शंकूला एक वक्रपृष्ठ आणि एक वर्तुळाकार कड असते, परंतु सपाट पृष्ठ नसते.
गोल
चेंडूसारख्या आकाराला गोल म्हणतात.
चला सराव करूया
अभ्यासा



3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी