♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 32

इ 7 वी  सेतू  अभ्यास दिवस 32

विषय  – गणित 

थोडं समजून घेऊ

एकमान पद्धत:

अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे याप्रकारे उदाहरण सोडवण्याच्या पद्धतीला एकमान पद्धत म्हणतात.

चला एका उदाहरणाद्वारे एकमान पद्धत समजून घेऊ.

दहा वह्यांची किंमत 200 रुपये आहे. तर 4 वह्यांची किंमत किती ?

4 वह्यांची किंमत काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका वहीची किंमत काढावी लागेल.

10 वह्यांची किंमत 200 रुपये आहे.

. एका वहीची किंमत = 200 : 10 = 20 रुपये यावरून 4 वह्यांची किंमत = 20 x 4 = 80 रुपये.

चला सराव करूया

उदा. 1. 15 केळ्यांची फणी 45 रुपयांना मिळते. तर 8 केळ्यांची किंमत किती ?

उकल: 15 केळ्यांची किंमत 45 रुपये

. एका केळ्याची किंमत = 45 ÷ 15 = 3 रुपये

यावरून, 8 केळ्यांची किंमत 8×3 = 24 रुपये

उदा.2. 10 किग्रॅ तांदळाची किंमत 325 आहे, तर 8 किग्रॅ तांदळाची किंमत काढा.

उकल: 10 किग्रॅ तांदळाची किंमत 325 आहे.

1 किग्रॅ तांदळाची किंमत = 325 ÷ 10 = 32.5 रुपये

यावरून, 8 किग्रॅ तांदळाची किंमत = 32.5 × 8 = 260 रुपये

सोडवून पाहू

1) 5 चेंडूंची किंमत 100 रुपये आहे तर एका चेंडूची किंमत किती ?

2) 14 खुर्च्याची किंमत 5992 आहे, तर 12 खुर्च्यासाठी किती रुपये दयावे लागतील ?

3) 30 डब्यांचे वजन 6 किग्रॅ आहे, तर 1080 डब्यांचे वजन किती किग्रॅ होईल ?


3. विषय – इंग्रजी

सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी