इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 28
विषय – गणित
maths-setu-
थोडं समजून घेऊ
गणित विषयाच्या लेखनात चिन्हांचा वापर केला जातो. गणितातील प्रत्येक चिन्हाला विशिष्ट अर्थ असतो. चिन्हांचा वापर केल्यामुळे लेखन अतिशय थोडक्यात करता येते. चिन्हाप्रमाणेच अक्षराचा वापरही गणितात केला जातो. अक्षरांचा वापर केल्याने लेखन सोपे व सुटसुटीत होते. गणिताच्या लेखनात वापरलेल्या अक्षरालाच “चल” असे म्हणतात. चलांचा वापर करून विविध बाबींचे गुणधर्मही व्यक्त करता येतात.
एक उदाहरण पाहू.
एका संख्येची दुप्पट 8 आहे.
आपण माहित नसलेल्या संख्येसाठी x या अक्षराचा वापर करू.
एका संख्येची दुप्पट 8 आहे. म्हणजेच, 2 x = 8 असे आपण लिहू शकतो.
चला सराव करूया
उदा. 1. कोणत्याही संख्येला ने गुणले असता गुणाकार तीच संख्या येते.
म्हणजेच,ax1=a
येथे या चलाचा वापर केला आहे.
उदा. 2. कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज समानच असते.
कोणत्याही दोन संख्यासाठी आणि b ही दोन अक्षरे वापरू. त्यांची बेरीज
a + b अशी येईल.
त्याच संख्यांचा क्रम बदलून बेरीज b + aअशी येईल.
यावरून, आणि b या कोणत्याही दोन संख्या असतील तर
a + b=b + a
असा नियम तयार होईल.

3. विषय – इंग्रजी
सेतू अभ्यास विषय इंग्रजी याचा अभ्यास करण्यासाठी