इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 23

इ   7 वी  सेतू  अभ्यास दिवस  23  

विषय  – गणित 

थोडं समजून घेऊ

विभाज्यतेची कसोटी 

2 ने विभाज्यतेची कसोटी संख्येच्या एककस्थानी 0,2,4,6, 8 यांपैकी कोणताही अंक असेल, तर ती संख्या 2 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 2 ने भाग जातो.

5 ने विभाज्यतेची कसोटी संख्येच्या एककस्थानी 0.5 यांपैकी कोणताही अंक असेल, तर ती संख्या 5 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 5 ने भाग जातो.

10 ने विभाज्यतेची कसोटी संख्येच्या एककस्थानी 0 असेल, तर ती संख्या 10 ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला 10 ने भाग जातो.

3 ची विभाज्यतेची कसोटी : जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 3 ने विभाज्य

असते. उदा. 924, 315, 849, 255.

4 ची विभाज्यतेची कसोटी : जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. उदा. 756, 924, 212, 848, 252.

9 ची विभाज्यतेची कसोटी : जर कोणत्याही संख्येमधील अंकांच्या बेरजेला 9 ने नि:शेष भाग जात असेल, तर ती संख्या 9 ने विभाज्य असते.

उदा. 756, 324, 252, 828, 999.

प्रश्न.1 खालील संख्या वाच. त्यांपैकी कोणत्या संख्या 2 ने, 5 ने किंवा 10 ने विभाज्य आहेत ते ओळखून रिकाम्या चौकटींत लिही.

135, 564, 475, 650, 400, 638, 606, 508, 9009, 5535, 6580

प्रश्न 2 

(1) 2 ने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही तीन अंकी पाच संख्या लिही.

(2) 5 ने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही तीन अंकी पाच संख्या लिही. 

(3) 10 ने विभाज्य असणाऱ्या कोणत्याही तीन अंकी पाच संख्या लिही.



Leave a comment