इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 22
विषय – गणित

आता आपण दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख कसा काढायचा ते पाहूयात. त्यासाठी एक उदाहरण आपण समजून घेऊयात. उदा. इयत्ता सहावीच्या वर्गात विविध खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे.

स्तंभालेख काढण्यासाठी पायऱ्या
1. प्रथम आलेख कागदावर डाव्या बाजूला एक उभी रेषा काढू तिला Y अक्ष असे नाव देऊ.
2. आलेखाच्या खालच्या बाजूला एक आडवी रेषा काढू तिला X अक्ष असे नाव देऊ.
3. X अक्षावर समान अंतरावर 5 खेळांची नावे लिहू व Y अक्षावर 11 सेंटीमीटरवर 1,2,3,4,5,6 अश्या संख्या दाखवू. येथे सर्वाधिक खेळ आवडणारी संख्या 6 आहे म्हणून Y अक्षावर जास्तीत जास्त 6 ते 7 संख्या दाखवणे पुरेसे ठरेल.
4. क्रिकेट – 6 सेमी, खो-खो 5 सेमी, कबड्डी 3 सेमी, फुटबॉल – 4 सेमी व बास्केटबॉल 2 सेमी या उंचीचे स्तंभ काढू.
5. शेवटी आलेख कागदाच्या वर उजव्या कोपऱ्यात प्रमाण 1 सेमी = 1 विद्यार्थी असे लिहू.

सोडवून पाहू
1. तुमच्या घरातील सर्व व्यक्तींच्या वजनाचा तक्ता तयार करा व ती माहिती दर्शवणारा स्तंभालेख काढा.
2. तुमच्या घरात असणाऱ्या कप, ग्लास, ताटे, वाट्या व तांबे यांची संख्या दर्शवणारा तक्ता तयार करा व ती माहिती दर्शवणारा स्तंभालेख काढा.