इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 43

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 43

विषय  – मराठी 

शिक्षकांनी विद्याथ्र्यांना खालील उतारा समजपूर्वक वाचण्यास सांगून त्याविषयी चर्चा करावी. उताऱ्याचा विषय मध्यवर्ती कल्पना समजून सांगणे. वाचन करताना महत्वाच्या मुद्यांना अधोरेखित करावे.

अधोरेखित मुद्दे थोडक्यात कसे लिहावे याविषयी माहिती सांगणे

नियमांचे पालन केले तर जशी एक शिस्त येते, तसेच व्यवस्थितपणा हा देखील एक महत्वाचा गुण आहे. तो गुण लहानपणापासूनच अंगी बाळगायला शिका. हा गुण आत्मसात केला तर तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. रोजच्या व्यवहारात तर व्यवस्थितपणा अतिशय उपयोगी पडतो. ऑफिस मध्ये जशी व्यवस्थितपणा ची गरज असते, तशी वैयक्तिक जीवनातही असते. कामात गोंधळ झाला की डोक्यात व्हायला वेळ लागत नाही. आताच्या तुमच्या शालेय जीवनात तुम्हीच करण्याजोगी काही कामे असतात. उदा. वह्यापुस्तके जागच्याजागी ठेवणे, दसर वेळेवर भरणे, डबा धुवायला टाकणे इ. कामात जर तुम्ही व्यवस्थित पण आणला तर कधीच तुमचा गोंधळ होणार नाही. या कामात आई-बाबांवर विसंबून राहू नका. एकदा परावलंबनाची सवय लागली की परत कधीच तुम्ही स्वावलंबी बनणार नाही. कामाचा ठरक, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा हे शिस्तीची अंगे आहेत. हे कौशल्य जर तुम्ही आत्मसात केले तर ते आयुष्यभर फलदायी ठरेल.

वरील उताऱ्याचे सारांशलेखन

नियमबद्ध वर्तन व व्यवस्थितपणा हे यशप्राप्तीचे सुनिश्चित मार्ग आहेत. व्यवस्थितपणा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य घटक आहे.

व्यवस्थितपणाची सवय जडण-घडणीच्या वयातच लावून घेतल्याने वैचारिक गोंधळ कमी होऊन कामामध्ये नीटनेटकेपणा येईल आणि स्वावलंबनाकडे वाटचाल होईल. कामाचा उरक, नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणा ही शिस्तीचे प्रमुख अंगे आहेत.

सारांशलेखन ही कृती सोडवताना

९. उताऱ्याचे समजपूर्वक वाचन.

२. आशयाचे आकलन.

३. मध्यवर्ती विचार जाणून घेणे.

४. समजलेला विचार स्वतःच्या शब्दात मांडणे.

५. मूळ विषय, विचार, आशयाचा पूर्ण अर्थ सारांशाने प्रतिबिंबित

व्हावा. याविषयी चर्चा करणे.

चला सराय करूया

विद्यार्थ्यांना पुढील उताऱ्याचे समजपूर्वक वाचन करण्यास सांगून त्या उताऱ्याचे लेखन

करण्यास सांगणे.

देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला भेट दिली. तेव्हा एका खोलीकडे हात करून डॉक्टर म्हणाले, “साहेब, येथे या खोलीत विमान चालविण्याचे, ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत. देशमुखांनी आशेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तेथे कोणीही दिसेना. तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले साहेब, ते सर्व वेडे खोलीतच आहेत. कदाचित पलंगाखाली झोपून, आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत अशी कल्पना करून विमान दुरुस्त करत असतील. आपण सामान्य माणसेही असेच कल्पनांचे, मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत. परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते, तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही.

वरील उताऱ्याच्या अनुषंगाने एका वाक्यात उत्तर येईल असे कोणतेही पाच प्रश्न तयार

करा.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment