इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 27

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 27

विषय  – मराठी 

 संकल्पना व सामाजिक समस्या यांच्यावर स्वतःचे विचार  मांडणे 

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा

पावसाळ्याचे दिवस होते.. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली होती नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. .खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या, ते कळलेच नाही तिकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या एवढ्यात नीला चा मोठ्याने रडण्याचा ओरडण्याचा आवाज आला धावा धावा लवकर या रजिया पाण्यात पडली कोणीतरी वाचवा हो !”ही हाक कुंदाच्या कानावर पडल्या बरोबर ती धावतच नदीकिनारी पोहोचली. रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. कुंदा ने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत नदीच्या दिशेने निघाली तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. कुंडाने रझियाला काठाकडे आणले. लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदा ने त्याला धरले सर्वानी या दोघींना बाहेर काढले ही बातमी गावभर पसरली. साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती.

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

कुंदा केव्हा पोहायला शिकली होती ?

कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले ?

.उतारा वाचून तुम्हाला कुंदाचे कोणते गुण जाणवले ते लिहा .

  • कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते लिहा.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment