इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 43

इ 5 वी  आजचा सेतू अभ्यास दिवस 43

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

सक्षम बनू या

शिक्षकांनी संवाद कसा लिहायचा याबाबतीत विद्यार्थ्यांना पुढील मुद्द्यांच्या आधारे मार्गदर्शन करावे.

1) संवादात दोन किंवा अधिक व्यक्ती सामील असतात.

2) संवादातील वाक्ये दुहेरी अवतरणचिन्हात लिहिली जातात.

3) संवाद म्हणजे एखाद्या विषयावर एकमेकांशी बोलणे असते.

4) संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पात्रांची संख्या कमी असावी.

5) संवादासाठी एक निश्चित विषय निवडावा व त्यावर आधारित पात्रांचे बोलणे असावे.

6) संवादात सलगता असावी.

7) वाक्ये जास्त मोठी नसावीत.

8) संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी वाक्यरचना सुटसुटीत असावी. योग्य ठिकाणी अवतरणचिन्हे वापरावीत.

शिक्षकानी वरीलप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पुढील विषयाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना संवाद लिहायला सांगावा.

सराव करू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील विषयावर संवाद लिहायला सांगावा. 1) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे, ता. भोर, जि. पुणे येथील विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या सहलीचे नियोजन करावयाचे आहे. शाळेतील 4 ते 5 वर्गप्रतिनिधी यांच्यात काय संवाद घडेल तो

विद्यार्थ्यांना लिहायला सांगावा.

2) बाजारात भाजीपाला आणायला तुम्ही गेला आहात अशी कल्पना करा भाजीविक्रेते व तुमच्यामध्ये काय संवाद होईल ते लिहा.

कल्पक होऊ या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पुढील कृती करून घ्यावी.

1) शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे नियोजन करावयाचे आहे. शाळेतील 4 ते 5 वर्गाप्रतिनिधी यांच्यात काय संवाद घडेल हे तू लिहा.

(या संवादात पुढील मुद्द्यांचा समावेश करा.)

(स्नेहसंमेलन कधी घ्यावे? त्यासाठी किती खर्च येईल? प्रमुख पाहुणे कोण?स्वागत बक्षिसे यासाठी प्रायोजक,

कोणकोणते कार्यक्रम आयोजित करावेत?)

2 ) शिक्षकांनी तीन विद्यार्थ्यांना पुढे बोलवावे, एकाच्या हातात खोडरबर, दुसऱ्याच्या हातात पेन्सिल व तिसऱ्याच्या हातात कागद द्यावा. कागद व पेन्सिल या पात्राच्या ठिकाणी मुलांना स्वतः ला मानायला/कल्पना करायला सांगून तिघे एकमेकांशी संवाद साधायला सांगतील याबाबत संवाद सादरीकरण करायला सांगावे व तो संवाद सर्व विद्यार्थ्यांना नंतर लिहायला सांगावा.


2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी




1 thought on “इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 43”

Leave a comment