इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 28
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
marathi-setu-
उतारा वाचन
विद्यार्थ्यांनी खालील उतारा काळजीपूर्वक वाचा
निसर्ग हा महान जादुगार आहे. त्याचे चमत्कार त्याच्या लीला अगाध आहेत. निसर्ग प्रसन्न रमणीय सौंदर्यशील आहे. त्याच्या संगतीत असताना कळत-नकळत आपण खूप काही शिकत असतो. आपण अंतर्मुख होतो. विचार करू लागतो. दुथडी भरून वाहणारी नदी उडी घेणारे जलप्रघात वाहता झरा, खळखळणारे ओढे हे सारे आपल्याला जणू पुढे जात राहा असा संदेश देत राहतात आसमंत गंधित करणारे सुगंधी फूल रिझवणारा झरा शेतात छाया देणारा, रसाळ फळे देणारा वृक्ष, आपल्यावर कृपेची बरसात करणारा मेघ हे सारे आपल्याला ‘देते व्हा’, ‘देण्यातला आनंद लुटा हा कानमंत्र देत राहतात प्रश्न: पुढील प्रश्न काळजीपूर्वक वाचा व अचूक उत्तरे द्या.
१) निसर्ग आपल्याला कोणता संदेश देतो?
२)फळे, फुले, मेघ आपल्याला कोणता संदेश देतात?
३) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा नदी, छाया, वृक्ष मेघ
४) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द सांगा. सुगंधी, पुढे, आनंद
५) निसर्गाची हानी होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घ्याल.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी