इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 44
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास

‘कोल्हयाला द्राक्षे आंबट
एका जंगलात एक कोल्हा रहात होता. एकदा त्याला खूप भुक लागली तेव्हा तो आपले भक्ष शोधण्यासाठी भटकत होता. तेव्हा त्याला द्राक्षांचा एक मळा दिसला. त्या मळयातील मंडपांवर चढलेल्या वेलींवर पिकलेल्या त्या द्राक्षांचे घड पाहून त्याच्या तोंडाला खूपच पाणी सुटले.

कोल्हयाने प्रथम त्या मळयात कोणीही राखणदार नाही ना! याची खात्री करून घेतली व मग तो त्या मळयात शिरला आणि एका मंडपाखाली जाऊन, खाली लोंबणारा द्राक्षांचा एक घड वेलीपासून तोडण्यासाठी उडया मारू लागला. ती द्राक्षे मिळविण्यासाठी त्याने खूप धडपड केली परंतु त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले कोल्याला समजले की, ही द्राक्षे मिळविणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून आपल्या मनाची समजूत घालण्यासाठी तो स्वतःशीच म्हणाला, “खरे पाहता, ही द्राक्षे अगदीच आंबट आहेत आणि तरी देखील ती मिळविण्यासाठी मी उडया मारण्यात माझा उगाच वेळ वाया घालविला. तेव्हा
आता या निरूपयोगी द्राक्षांचा नाद सोडून आपण एखादी चांगली रूचकर शिकार मिळविण्याच्या मागे लागणे हेच ठीक आहे.”
सक्षम होऊ या :
कृती १. विविध म्हणी, त्यांचे अर्थ त्यातली गम्मत, त्यांचा भाषेत होणारा वापर त्यामुळे समृद्ध होणारी भाषा इत्यादी विषयी शिक्षकांनी मुलांना सोप्या भाषेत सांगावे.
कृती २. शिक्षकांनी गोष्टीचे आदर्श वाचन करून दाखवावे जेणेकरून मुलांना अर्थाचे योग्य आकलन होण्यास मदत होईल.
(टीप:- म्हणी जरी कळण्यास काहीशा अवघड असल्या तरीही छोट्या, सोप्या म्हणींचा वापर मुले दैनंदिन जीवनात निश्चित वापरू शकतात.)
सराव करूया :
शिक्षकांनी विविध म्हणी व त्यांचे अर्थ याचा मुलांकडून सराव घ्यावा व विविध म्हणींच्या गोष्टी मुलांना सांगाव्यात.
कल्पक होऊ या:
शिक्षकांनी वर्गात घडणाऱ्या प्रसंगावरून एखादी म्हण त्याच्याशी कशी सुसंगत होऊ शकते याचे
उदाहरण द्यावे व खालील कृती करून घ्यावी.
‘गर्वाचे घर खाली’ या म्हणीवर आधारित वर्गात घडलेली गोष्ट तयार करून सांगा.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी