इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 23

इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 23 

विषय  – मराठी आजचा सेतू अभ्यास

विरामचिन्हे (पुर्णविराम स्वल्पविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह )

खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा 

१) आज कोणता वार आहे ?

२) सुनील, मराठीचे पुस्तक घेऊन ये.

३) अरे वा! किती सुंदर अक्षर आहे तुझं !

 ४) आई म्हणाली, “बाळ, लवकर तयार हो, नाहीतर शाळेला उशीर होईल.”

५) सुरेश, रमेश आणि महेश खूप चांगले मित्र आहेत.

. शिक्षकांनी विद्यार्थ्यासोबत वरील प्रकारच्या वाक्यातील सर्व विरामचिन्हे व त्यांचे कार्य याविषयी

चिकित्सक प्रश्न विचारावे.

जसे
१) वाक्य प्रश्नार्थी आहे हे कशावरून समजते ?
२) उद्गारवाचक चिन्ह केव्हा वापरले जाते ?
३) स्वप्ल्पविराम आणि पूर्णविराम यांचा वापर केव्हा केला जातो ?
४) दुहेरी अवतरणचिन्हे कोणत्या हेतूने वापरली जातात ?
५) एकेरी अवतरणचिन्ह व दुहेरी अवतरणचिन्ह यांचा वापर कोठे केला जातो ?

सक्षम बनू या..

खालील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे वापरा .

प्र. शीतल तू अभ्यास केला आहेस का

उत्तर : ………………………………………….

प्र. बापरे केवढा मोठा साप आहे हा 

उत्तर : ………………………………………….

गावातील जत्रा या विषयी दोन मित्रातील संभाषण लिहा. 


Leave a comment