इ 3 री आजचा सेतू अभ्यास दिवस 23
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास
र च्या खुणा प्रकार
खालील माहिती वाचा व आपल्या वहीत लिहा
अ) प् र हा उच्चार प्र कसा होतो हे उच्चारून दाखवतील.
आ) क् + र= क्र (क्रमांक), श् + र= श्र (श्रीमंत), त् + र= त्र (सत्र),
इ) घ्+र=घ्र (व्याघ्र),
ई) ग् + र=ग्र (ग्रह),
त्याप्रमाणे ग्र, म्र, क्र, द्र, व्र हे उच्चार कसे होतात हे मुलांना विचारतील. नंतर काही शब्द फळयावर लिहून वाचन घेतील.
उदा- प्रवीण, ग्रहगोल, नम्रता, चक्र, द्राक्षे, पत्र, श्रावणी
खालील शब्द वाचा व आपल्या वहीत लिहा
उदा-सुऱ्या, पुऱ्या, खऱ्या, बऱ्याचदा, कुऱ्हाड, वऱ्हाड व हे शब्द लिहा
पुस्तकातील असे दहा शब्द शोधून आपल्या वहीत लिहा