mahashivratri 2020 : महाशिवरात्रीनिमित्त स्मार्टफोन्सवर डिस्काउंट – mahashivratri 2020 bumper discount on smartphones

[ad_1]

नवी दिल्लीः आज महाशिवरात्री दिनाचे औचित्य साधून मोबाइल खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर सॅमसंग, विवो, रेडमी आणि रियलमीच्या फोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. सॅमसंग गॅलेक्सी केवळ २२ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. तर ४८ मेगापिक्सलचा रेडमी नोट ७ प्रो हा फोन ९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई-कॉमर्स साइटवरून अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त डिस्काउंट दिला जाणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए५० चा ४ जीबी रॅमच्या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये तर ६ जीबी रॅम फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनमध्ये ६४ जीबीचा स्टोरेज देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस९ फोन २२ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मिळणार आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन ६१ हजार ९०० रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. विवो झेड वन प्रो हा फोन १२ हजार ९९० रुपयांत विक्री केला जात आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टेरोजचा फोन १३ हजार ९९० रुपयांत, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १५ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. अॅक्सिक बँकेकडून या फोनवर १० टक्के तत्काळ डिस्काउंट दिला जात आहे. तसेच सर्व प्रीपेड पेड केल्यास १ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे.

रेडमी नोट ७ प्रो चा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९९९९ रुपये, ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये व ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. रियलमी एक्स २ प्रो चा ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये आहे.

‘टेक्नो’चे दोन स्मार्टफोन लाँच; किंमत ९९९९ ₹

जिओः स्वस्त प्लान बंद, आता जास्त पैसे मोजा

सॅमसंग गॅलेक्सी Z Flip ची प्री बुकिंग उद्यापासून

रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय गुगल बंद करणार



[ad_2]

Source link

Leave a comment