♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

लॉकडाऊन वार्षिक निकाल २०२०- २१ कसा तयार करायचा ? माहीती बाबत ​

लॉकडाऊन वार्षिक निकाल २०२०- २१ कसा तयार करायचा ? माहीती बाबत………

 वार्षिक निकाल २०२०-२१ बाबत

सन २०२०-२१ चा वार्षिक निकाल कसा तयार करावा याबाबतील शासन निर्णय शासन परिपत्रके राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे दि. ८ एप्रिल २०२१ चे परिपत्रक यांच्या आधारे नमुना नोंदी व माहीती तयार केले आहे. कदाचित यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या असू शकतील. तरी आपणास अशा त्रुटी आढळून आल्या तर नक्की संपर्क करा.

       Covid-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जून २०२० पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २२ जुलै २०२० रोजी ऑनलाईन शिक्षण सुरु करणेबाबत परिपत्रक काढले. बऱ्याच शाळांमध्ये त्यापूर्वीच ऑनलाईन शिक्षण सुरु सुद्धा झाले होते. मध्यंतरी जानेवारी २०२१ काही काळ इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरु झाले परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा हे वर्ग बंद झाले. शासनाने इयत्ता १ ली ते ८ वी च्या परीक्षा रद्द करून सरसकट सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय जाहीर केला. सोबतच नोंदवहीमध्ये आकारिक मूल्यमापनाच्या आधारे श्रेणी देणेबाबत आदेशित केले. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (MSCERT) दि. ८ एप्रिल २०२१ रोजी परिपत्रकाद्वारे इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे बाबत परिपत्रक काढले आहे.

१) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ.१ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 कलम १६ अन्वये वर्गोन्नती देण्यास मान्यता दिली आहे.

२) ज्या शाळांनी संकलित मूल्यमापन केले आहे त्या शाळांनी सालाबादप्रमाणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची पद्धती वापरून मूल्यमापन व नोंदवही करावी.

(३) शैक्षणिक वर्ष२०२० २१ मध्ये शिक्षकांनी विवध साधन तंत्रांचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत फक्त आकरिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करण्यात यावी.

आकारिक मूल्यमापनाच्या आधारे खालीलप्रमाणे विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यात यावी.

ऑनलाईन/ ऑफलाईन  शिक्षणाच्या प्रवाहात नसलेले विदयार्थी 

शैक्षणिक सत्र 2020-2021 मध्ये कोणत्याही कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक, संकलित मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर आर.टी.ईअ‍ॅ क्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत” असा शेरा नमूद करण्यात यावा. या व्यतिरिक्त इतर कोणताही शेरा नमूद करण्यात येऊ नये. मूल्यमापना संदर्भात क्षेत्रीय स्तरावरून मूल्यमापना बाबत इतर कोणत्याही सूचना देण्यात येऊ नयेत. सदर सूचना राज्य शासनाच्या अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहतील, ऑनलाईन/ ऑफलाईन  शिक्षणाच्या प्रवाहात नसलेले विदयार्थी यांच्यासाठी गुणपत्रिका नमुना

result-format

सूचना–  वेळोवेळी अपडेट होणारे शासन निर्णय लक्षात घेऊन ,माहिती घेऊन निकाल तयार करावा

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा