Lava A1 Colors : लावाचा नवा फोन लाँच; किंमत फक्त ९९९ ₹ – lava a1 colors feature phone launched at rs 999 in india

[ad_1]

नवी दिल्लीः लावा कंपनीने आपला आणखी एक नवीन फोन लाँच केला आहे. या फोनचे नाव Lava A1 Colors आहे. कंपनीचा हा फोन म्हणजे खास एडिशन फीचर फोन आहे. या फोनची किंमत फक्त ९९९ रुपये इतकी आहे. हा फोन लाइट ब्लू, ग्रीन आणि मॅझेंटा रेड या तीन रंगात उपलब्ध आहे. लावाचा हा फोन पॉलिकॉर्बोनेट बॉडीसह आहे. या फोनमध्ये १.८ इंचाचा टीएफटी डिस्प्ले दिला आहे. या फोनचा स्क्रीन रिझॉल्यूशन १२८x१६० पिक्सल आहे.

लावाचा हा फोन इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, पंजाबी आणि गुजराती या सात भाषेत सपोर्ट करणार आहे. या फोनमध्ये कॉन्टॅक्ट फोटोज, आयकॉन सपोर्ट, इंस्टंट टॉर्च आणि ऑटो कॉल रिकॉर्डिंग करण्याची सुविधा आहे. फोनच्या टॉर्चमध्ये सेंटर नेव्हिगेशन बटन क्लिक केल्यानंतर तत्काळ सुरू होते. या फोनमध्ये कॅलक्युलेटर, स्टॉपवॉच, कॅलेंडर आणि अलार्म यासारखे फीचर देण्यात आले आहेत. लावाच्या या फोनमध्ये ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर या फोनची बॅटरी तीन दिवस राहत असल्याचा कंपनीचा दावा आहे. फोनमध्ये ०.३ मेगापिक्सलचा बॅकला कॅमेरा दिला आहे. याआधी लावाने भारतीय बाजारात Lava Z53 स्मार्टफोन लॉन्च केला होता. या फोनची किंमत ४ हजार ८२९ रुपये होती.

सॅमसंग गॅलेक्सी M31फोनचा आज पहिला सेल

रियलमीचे दोन स्मार्टफोन आज लाँच होणार

फोटोः मार्च महिन्यात ‘हे’ स्मार्टफोन लाँच होणार



[ad_2]

Source link

Leave a comment