fake alert : Fake Alert: मुलाच्या मारहाणीचा पोलिसाचा फोटो दिल्लीचा नव्हे तर बांगलादेशचा आहे – fake alert: old picture shows policeman trying to hit a minor with baton is from bangladesh shared as of delhi

[ad_1]

फेसबुक युजर Anil Kumar Yadav ने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एक पोलीस कर्मचारी मुलावर लाठीमार करताना दिसत आहे. या फोटोसोबत कॅप्शन लिहिलेय की, खूप मोठ्या दहशतवाद्याला मारहाण करताना दिल्ली पोलीस.


काँग्रेसचे नेते उदित राज यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला कॅप्शन देताना ते म्हणाले, खबरदार, एका मुलाची हत्या, एका महिलेचा मृत्यू, एका व्यक्तीला गोळ्या घालणे, हे काही एखाद्या शासनाचे पतन नाही तर ते संपूर्ण राष्ट्राचे पतन आहे.

उदित राज यांनी शेअर केलेला फोटो दिल्लीचा आहे, असे म्हटले नाही. परंतु, त्यांच्या या शब्दावरून अप्रत्यक्षपणे हेच सुचित होते.


खरं काय आहे?

हा फोटो भारताची राजधानी दिल्लीतील नाही. तर तो बांगलादेशची राजधानी ढाका येथील आहे. तसेच हा फोटो १० वर्षापूर्वीचा आहे.

कशी केली पडताळणी?

व्हायरल फोटो गुगलवर रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्ही The Guardian ची ३० जून २०१० रोजी प्रकाशीत झालेला
रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टचे शीर्षक ‘Children beaten by Bangladeshi police as they join garment workers’ strikes’ होते. यात वापरलेला फोटो आता दिल्लीचा म्हणून शेअर केला जात आहे.

फोटोसाठी AFP/Getty Images आणि मुनीर उज जमानला क्रेडिट दिले आहे. कॅप्शननुसार, हा फोटो ढाकामधील कपड्यांच्या कर्मचाऱ्यांत झालेल्या वादात पोलिसांनी एका मुलाला मारहाण केली आहे.

रिपोर्टनुसार, ढाकात रोजंदारीवर काम करणाऱ्या टेक्स्टाइल कामगारांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी गॅसच्या नळकांड्या, पाण्याचा मारा, लाठीमार केला होता.

हा फोटो आम्हाला
Getty Images वर याच कॅप्शनसोबत मिळाला आहे.

निष्कर्ष

छोट्या मुलाला लाठीने मारहाण करीत असल्याचा जो फोटो दिल्लीचा म्हणून शेअर केला जात आहे. तो दिल्लीचा नसून बांगलादेशचा आहे. तसेच तो १० वर्षापूर्वी जुना आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment