laptop insufficiency : पुण्यात ‘वर्क फ्रॉम होम’ साठी लॅपटॉपचा तुटवडा – laptop insufficiency for work from home in pune city

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले असले, तरी त्यांच्यापुढे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या अनुपलब्धतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यावर मात करण्यासाठी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची योजना सुरू केली असून, त्याद्वारे लॅपटॉप खरेदी करण्यास साह्य केले जात आहे.

कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ची सुविधा देताना अनेक कंपन्यांपुढे पायाभूत सुविधांची समस्या उभी राहत आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांकडे घरी लॅपटॉप, कम्प्युटर किंवा ब्रॉडबँड कनेक्शन नसल्याने ‘वर्क फ्रॉम होम’च्या सुविधेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावर पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी लॅपटॉप, डेस्कटॉप भाड्याने घेतले आहेत. मात्र, त्यासाठीही आता त्यांना जादा दर मोजावे लागत आहेत.

ही समस्या सोडविण्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी विनाव्याज कर्ज देण्याची योजना आखली आहे. यामध्ये अगदी ६० ते ७० हजार रुपयापर्यंत किमतीचा लॅपटॉप खरेदी करण्याची मुभा त्यांना दिली असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.



लॅपटॉपचे भाडे दुप्पट

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर बहुतांश खासगी कंपन्यांनी कामगारांना घरून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, त्यासाठी लॅपटॉप मोठ्या प्रमाणावर भाड्याने घेण्यात येत आहेत. लॅपटॉपला एकाएकी मागणी वाढल्याने त्याचे भाडे दुपटीने वाढले आहे. लॅपटॉपसाठी साधारण १५०० रुपये मासिक भाडे आकारले जाते. ते आता २५०० ते ४००० रुपयांवर पोहोचले आहे.


‘लॉकडाउन’मुळे आव्हान

सध्या पुण्यात ‘लॉकडाउन’ आहे. राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे घरून काम करण्यासाठी आवश्यक ती साधने मिळवणे अवघड होणार आहे. त्यामुळे कंपन्यांपुढील आव्हान आणखी मोठे होणार आहे.

जिओ ग्राहकांना करोनाचे प्रत्येक अपडेट मिळणार

Whatsappचं नवं फीचर, फेक मेसेज तुम्हीच ओळखा

व्होडाफोनचाही ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान; ५ नवे प्लान



[ad_2]

Source link

3 thoughts on “laptop insufficiency : पुण्यात ‘वर्क फ्रॉम होम’ साठी लॅपटॉपचा तुटवडा – laptop insufficiency for work from home in pune city”

Leave a comment