महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे दिनांक 28 मार्च 2023 रोजी आदेशानुसार समग्र शिक्षा अंतर्गत मॉनिटरिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम मधून केंद्रप्रमुखांना सनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध करून देण्याबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत मॉनिटरिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम एम आय एस मधून 6170 केंद्रप्रमुख यांना सनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध करून देण्याबाबत राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेद्वारे अंतिम करण्यात आलेल्या निम्नतम दरानुसार मिनीटेक सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांची निवड करण्यात आली आहे.
त्यानुसार जी इ एम पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने पुरवठा आदेश सदर कंपनीला देण्यात आला आहे.
पुरवठा देशाच्या अनुषंगाने प्रणाली वरील करारनामा आदेश स्वीकृत केल्याबाबत कळविले आहे.
त्या अनुषंगाने 6170 केंद्रप्रमुखांना सन नियंत्रण करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा निहाय टॅबलेट संख्या देखील सदर आदेशा सोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे.