iphone 11 : जगात सर्वाधिक विकला जाणारा ‘हा’ स्मार्टफोन – iphone xr tops 2019 global best-selling chart, iphone 11 comes in second

[ad_1]

नवी दिल्लीः जगात सर्वाधिक विकला जाणाऱ्या स्मार्टफोनची यादी जारी करण्यात आली आहे. आयफोन एक्सआर iPhone XR हा स्मार्टफोन जगात सर्वात जास्त विकला जाणारा फोन ठरला आहे. तर गेल्या सप्टेंबर महिन्यात लाँच झालेला आयफोन ११ सर्वाधिक विकला जाणारा दुसरा फोन ठरला आहे. काउंटरपॉइंट ने मार्केट प्लस नावाचा रिपोर्ट जारी केला असून या यादीत १० स्मार्टफोनच्या नावाचा समावेश आहे.

जगात सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन आयफोन एक्सआर iPhone XR आहे. बाजारात या फोनचे मार्केट शेअर ३ टक्के आहेत. या यादीत अॅपलचे सहा आयफोन आणि सॅमसंगचे चार स्मार्टफोनचा समावेश आहे. २०१९ मध्ये आयफोन एक्सआर iPhone XR चे ४६३ लाख, आयफोन ११ चे ३७३ लाख, सॅमसंग गॅलेक्सी ए१०चे ३०३ लाख, गॅलेक्सी ए५० चे २४२ लाख, गॅलेक्सी ए२० चे १९२ लाख, आयफोन ११ मॅक्सचे १७६ लाख, आयफोन ८चे १७४ लाख, रेडमी नोट ७ चे १६४ लाख, आयफोन ११ प्रोचे १५५ लाख आणि गॅलेक्सी जे२ कोर चे १५२ लाख फोनची विक्री झाली आहे.

या रिपोर्टवर एक नजर टाकल्यास सॅमसंगने केलेली रणनीती यशस्वी झाल्याचे दिसत आहे. सॅमसंगने गेल्या वर्षी जे सीरिज बंद करून ए आणि एम सीरिज लाँच केली होती. जगातील टॉप १० स्मार्टफोनच्या यादीत सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजचे तीन स्मार्टफोनचा समावेश आहे. वर्ष २०१८ मध्ये टॉप स्मार्टफोनची यादी समोर आली होती. या यादीतही सॅमसंगचे तीन फोन होते. ते एस सीरिजचे होते. यात अॅपलला मोठा फायदा झाला आहे. लाँचिंगनंतर अवघ्या ४ महिन्यात आयफोन ११ जगातील सर्वात जास्त विकला जाणारा दुसरा स्मार्टफोन बनला आहे.


रियलमी ६ सीरीज स्मार्टफोन ५ मार्चला लाँच होणार

श्रीमंत वॉरेन बफे आता ‘हा’ स्मार्टफोन वापरतात

रियलमीच्या ‘या’ ३ फोनवर २००० ₹ डिस्काउंट

सॅमसंग गॅलेक्सी M31 स्मार्टफोन भारतात लाँच



[ad_2]

Source link

Leave a comment