internet privacy : ऑनलाइन प्रायव्हसीला मोठा धोका पोहोचू शकतो, कसा? – major internet online privacy issues and how to avoid them

[ad_1]

उत्कर्ष जोशी

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अनेक कंपन्यांनी शक्य तितकी कामं आणि बैठका ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्सच्या माध्यमातून करायला सुरुवात केली आहे. ‘स्काईप’ याबाबतीत लोकप्रिय होतंच. मात्र त्याचबरोबर या स्पर्धेत ‘झूम’, सिस्को वेबेक्ससारखी अॅप्ससुद्धा उतरली. सहजसोप्या युजर इंटरफेसमुळे ही अॅप्स अल्पावधीतच लोकप्रियही झाली. मात्र अचानक इथे वाढलेल्या वेब ट्रॅफिकमध्ये हॅकर्सना संधी दिसू लागली. नुकत्याच अशाच एका प्रसिद्ध अॅपमधील डेटा हॅकर्सनी जाहिरातबाज कंपन्या किंवा इतर आक्षेपार्ह ठिकाणी विकून त्याचा गैरवापर केल्याचं उघडकीस आलं आणि अनेकांना धक्का बसला. यामुळे ऑनलाइन गोपनीयतेस मोठा धोका पोहोचतो आहे.

मीटिंगमध्ये अश्लील दृश्यं

काही खोडसाळ व्यक्तींनी अशीच एक मीटिंग हॅक करून आपापल्या व्हिडीओमध्ये अश्लील दृश्यं सुरू केली आणि मीटिंगमध्ये एकच गडबड उडाली. केवळ कॉर्पोरेट मीटिंग नव्हे तर शाळा-कॉलेजांतील ऑनलाईन लेक्चर्स अनेक ठिकाणी अशा प्रकारे हॅक झाली.

असुरक्षित माहिती

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्सही हॅकर्स सहज लक्ष्य करू शकतात. एंड टू एंड इन्क्रीप्टशनच्या अभावामुळे तुमचा व्हिडीओ डेटा तुमच्या डिव्हाइसपासून सर्व्हरपर्यंत पोहोचण्याच्या आधी हॅकर्स त्यावर ताबा मिळवू शकतात. अनेकदा मीटिंग पासवर्ड प्रोटेक्टेड नसल्यामुळे एखादा नवखा हॅकरदेखील घरबसल्या जगभरात कुठल्याही मीटिंगमध्ये सहभागी होऊ शकतो, तेही मीटिंग आयोजित करणाऱ्या व्यक्तीच्या नकळत.

सुरक्षेचं काय?

छोटेखानी बैठका, मोठं मोठी कॉर्पोरेट ट्रेनिंग इथपासून ते काही देशांत राजकीय बैठकादेखील अशाच अॅप्समार्फत पार पडतात. मात्र सुरक्षा त्या तुलनेत फारच जुजबी स्वरूपाची असते. त्यामुळे अनेक बड्या संस्था, राजकीय व्यक्ती आणि सुरक्षा यंत्रणा यांना गाफील राहणं महागात पडू शकतं.


काही उपाययोजना


० व्यक्तिगत आयडीचा वापर टाळा.

० प्रत्येक बहुसदस्यीय मीटिंगसाठी व्यक्तिगत आयडी वापरू नका.

० प्रत्येकवेळी वेगवेगळा आयडी वापरा.

वेटिंग रूमचा वापर

तुम्ही एखादी मीटिंग आयोजित करणार असाल, तर ‘वेटिंग रूम’सारख्या सोयीचा वापर करा, जेणेकरून मीटिंग जॉईन करणाऱ्या प्रत्येक सदस्याला आधी आयोजकाची परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे अनधिकृत सदस्य तुम्ही ओळखू शकाल आणि त्यांच्यावर निर्बंध लावू शकाल.

अनावश्यक फीचर्स बंद

जॉइन बीफोर होस्टसारखी फीचर्स बंद करून ठेवा. तसंच ‘स्क्रीन शेअर’साठी परवानगी देऊ नका. मीटिंगदरम्यान तुम्ही आपापसात केलेलं संभाषण किंवा पाठवलेल्या फाइल्स ऑटो सेव्ह करण्याचा पर्याय बंद ठेवा.

अनेकदा आपण मीटिंगसाठी पासवर्ड ठेवत नाही. तुम्ही एकदा मिटिंग आयडी शेअर केलात की तो कुणाच्या हाती जाईल याची काहीच खात्री घेता येत नाही. फार उच्च दर्जाची सुरक्षाही नसल्याने काही अॅप्स या बाबतीत अगदी सहज लक्ष्य झाली. मीटिंगमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक सदस्याकडे लक्ष देऊन खात्री करून घेणंदेखील आपण टाळतो. तुमची मीटिंग रेकॉर्ड करून त्या फुटेजचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे काही सूचनांचं पालन प्रत्येक युजरनं केलंच पाहिजे.

– तुषार भगत (रिस्पॉन्सिबल नेटीझन)



[ad_2]

Source link

Leave a comment