[ad_1]
हाच फोटो काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी ट्विटरवर आपला डिस्प्ले पिक्चर ठेवला आहे.
alka-lamba
खरं काय आहे ?
हा फोटो रोहिंग्या मुस्लिम मुलीचा आहे. हा फोटो २०१७ रोजीचा आहे. या फोटोचा भारताशी काही संबंध नाही. फोटो बांगलादेशात काढलेला आहे.
कशी केली पडताळणी ?
रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला २३ फेब्रुवारी २०१८ रोजी छापलेली न्यूज वेबसाइट सीएनबीसीची एक बातमी मिळाली.
या बातमीचे शीर्षक ’10 global hotspots for major human rights violations in 2017 होते. या स्टोरीत हाच फोटो वापरला आहे. आता जो शेअर केला जात आहे.
फोटोसाठी Getty Images च्या Paula Bronstein ला क्रेडिट दिले होते. फोटोसाठी कॅप्शन दिले होते, हा फोटो १६ ऑक्टोबर २०१७ रोजी बांगलादेशच्या कॉक्स बाजारात काढलेला आहे. ही मुलगी रोहिंग्या मुसलमान आहे. जी म्यानमारवरून या ठिकाणी पोहोचली.
निष्कर्ष
बांगलादेशमधील रोहिंग्या मुस्लिम मुलीचा २०१७ रोजी काढलेला फोटो इमरान प्रतापगढी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी शेअर केला, असे ‘मटा फॅक्ट चेक‘च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
[ad_2]
Source link