Honor Play 4T : ऑनर प्ले 4T ९ एप्रिलला लाँच होणार, पाहा किंमत – honor play 4t smartphone launch on 9 april know expected price and specifications

[ad_1]

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ऑनर (Honor) बजेटमधील स्मार्टफोन प्ले ४टी (Honor Play 4T) ९ एप्रिल रोजी जागतिक बाजारात लाँच करण्याची तयारी करीत आहे. या फोनसंबंधीची काही माहिती लीक झाली आहे. ज्यात या फोनच्या फीचर्सची माहिती मिळाली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, युजर्सला ऑनर प्ले ४ टीमध्ये चार कॅमेऱ्यासोबत जबरदस्त प्रोसेसर मिळणार आहे.

शाओमी, ओप्पो कंपनीच्या स्मार्टफोन किंमतीत वाढ

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, आगामी ऑनर प्ले ४ टी या स्मार्टफोनची किंमत १० हजार ते १५ हजार रुपये दरम्यान असणार आहे. या फोनची खरी किंमत आणि यात काय-काय फीचर्स असतील ते सर्व लाँचिंग नंतर स्पष्ट होईल. परंतु, लीक झालेल्या रिपोर्टनुसार, कंपनी या फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये किरिन ८१० चिपसेटसह ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी मिळण्याची शक्यता आहे. या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे झाल्यास या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला जाणार आहे. तसेच या फोनमधील सेन्सर संदर्भात अद्याप कोणतीही माहिती लीक झालेली नाही.

GST: आयफोनच्या किंमतीत ५९०० रुपयांपर्यंत वाढ

ऑनरच्या या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्याची शक्यता आहे. २२ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असणार आहे. तसेच या फोनमध्ये ४जी एलटीई, ब्लूटूथ, वाय फाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखे फीचर दिले जाण्याची शक्यता आहे.

GST: रियलमीचे स्मार्टफोन १८ टक्क्यांपर्यंत महाग



[ad_2]

Source link

Leave a comment