[ad_1]
वाचाः‘रेडमी नोट ९ प्रो मॅक्स’चा आज भारतात पहिला सेल
Honor 9X Pro स्मार्टफोनच्या लाँचिंग संदर्भात माहिती कंपनीने एक ट्विट करून दिली होती. आम्हाला ही घोषणा करताना अत्यानंद होत आहे की, प्री इन्स्टॉल #AppGallery आणि 7nm Kirin 810 चिपसेट सोबत ऑनरचा पहिला स्मार्टफोन Honor 9X Pro १२ मे रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे.
भारतात या स्मार्टफोनची किंमत १५ ते २० हजार रुपये या दरम्यान असू शकते. ग्लोबल बाजारात या फोनची किंमत २४९ यूरो म्हणजेच २० हजार ४०० रुपये आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्टवरून करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि पर्पल या दोन रंगात उपलब्ध असणार आहे.
वाचाः करोनाविरोधात जग ‘या’ टेक्नोलॉजीचा वापर करतेय
Honor 9X Pro ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ६.५९ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल मिळू शकतो. फोनमध्ये 7nm Kirin 810 चिपसेट, ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाणार आहे. तसेच या फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे. फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
वाचाः लॉकडाऊनः जिओचा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लान लाँच
वाचाः लॉकडाऊनमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?
वाचाः ‘रेडमी नोट ९ प्रो’च्या जाहीरातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी

Honor 9X Pro
[ad_2]
Source link