honor 8a prime : चीनमध्ये ऑनर 8A प्राईम लाँच, पाहा किंमत-फीचर्स – honor 8a prime with mediatek helio p35 soc, 13-megapixel rear camera launched in china. know price and specifications

[ad_1]

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ऑनरने आपला Honor 8A Prime स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. याआधी ऑनरने ९ ए आमि ३० एस हे फोन लाँच केले होते. युजर्संना या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ३५ चिपसेट, १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ३ जीबी रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच करणार आहे, याविषयी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

Honor 8A Prime ची किंमत

कंपनीने ऑनर ८ए प्राईमचा ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टेरोजचा स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. या फोनची किंमत ९ हजार ६०० रुपये आहे. हा फोन ब्लू, ग्रीन आणि मिडनाइट ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध केला आहे.


‘विवो इंडिया’कडून राज्य सरकारला १ लाख मास्क

Honor 8A Prime खास वैशिष्ट्ये

या फोनमध्ये ६.८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन ७२०x१५६० पिक्सल आहे. तसेच कंपनीने या फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ स्टोरेजसह मीडियाटेक हीलियो पी ३५ एसओसीचा सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्रॉयडवर ईएमयूआय ९.० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे.

Honor 8A Prime चा कॅमेरा

युजर्संना या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा मिळणार आहे. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. या फोनच्या कॅमेऱ्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा फुल एचडी रिझॉल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.

BSNLचा युजर्संना झटका, या प्लानच्या वैधतेत घट

Honor 8A Prime ची बॅटरी

कंपनीने या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ४ जी एलटीई, जीपीएस, ग्लोनेस, वायफाय, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट यासारखे फीचर दिले आहेत. तसेच फोनमध्ये ३०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.

Text मेसेज डिलिट झालाय?, ‘असा’ परत मिळवा



[ad_2]

Source link

1 thought on “honor 8a prime : चीनमध्ये ऑनर 8A प्राईम लाँच, पाहा किंमत-फीचर्स – honor 8a prime with mediatek helio p35 soc, 13-megapixel rear camera launched in china. know price and specifications”

Leave a comment