[ad_1]
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टने एक डेटा जारी केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, वेबसाइटवर ग्राहक सर्वात जास्त काय सर्च करीत आहेत. फ्लिपकार्टच्या माहितीनुसार, ग्राहक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, आणि पर्सनल ग्रुपिंगला मोठ्या प्रमाणात सर्च करीत आहेत. मोबाइल फोन सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे. लोकांनी मिड – प्रीमियम सेगमेंटच्या फोनला सर्वात जास्त सर्च केले आहे. ट्रिमरला सुद्धा फ्लिपकार्टवर टॉप टेन मध्ये सर्च करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून आता पर्यंत ट्रिमर सर्चमध्ये ४.५ पट वाढ झाली आहे.
वाचाःलॉकडाऊनः गुगलचे खास डुडल, घरात बसून खेळा Halloween गेम
फ्लिपकार्टवर ग्राहकांनी साड्यांना सुद्धा खूप प्रमाणात सर्च केले आहे. देशात लॉकडाऊन सुरू असल्याने कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्यामुले हेडसेटला सुद्धा खूप सर्च करण्यात आले आहे. तसेच गॅस स्टोव्ह, फॅन आणि एयर कंडिश्नर (एसी), आधीच्या तुलनेड दुप्पट सर्च करण्यात आले आहे.
वाचाःआरोग्य सेतू अॅप सुरक्षित, हॅकर्सच्या दाव्यावर स्पष्टीकरण
[ad_2]
Source link