fake alert : Fake Alert: दिल्ली हिंसाचारात अनुराग मिश्राने गोळीबार केला नाही – fake alert: anurag mishra not the gunman who fired in jafrabad during delhi violence

[ad_1]

दिल्लीमधील हिंसाचारात गोळीबार करणाऱ्या व्यक्तीच्या नावावरून सोशल मीडियात शाब्दिक चकमक उडत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. सोशल मीडियात अनेक जण म्हणतात की, गोळीबार करणारा शाहरुख नव्हे तर तो अनुराग मिश्रा आहे. या दाव्यासह फेसबुक प्रोफाइलचा स्क्रीनशॉट आणि जाफराबाद मधील शूटिंग करणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

खरं काय आहे?

दिल्ली हिंसाचारावेळी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव शाहरुखच आहे. अनुराग मिश्रा नाही. या दाव्यासह ज्या व्यक्तीचे फेसबुक प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. तो पेशाने अभिनेता आहे. व हिंसाचारावेळी तो वाराणसी मध्ये होता.

कशी केली पडताळणी?

व्हायरल पोस्टमध्ये ज्या व्यक्तीचे ‘Anurag D Mishra’ च्या फेसबुक प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. टाइम्स फॅक्टने त्याच्याशी संपर्क केला आहे.

अनुराग मिश्रा यांनी सांगितले की, यासंबंधीची माहिती मला कुटुंब, नातेवाईकांकडून मिळाली. मी मुंबईतील रहिवासी आहे. व व्यवसायाने अभिनेता आहे. परंतु, दिल्लीत हिंसाचार झाला त्या दिवशी वाराणसीत काही कामानिमित्त सहभागी होण्यासाठी आलो होतो. आताही त्याच ठिकाणी आहे. माझ्या फोटोचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला. त्यामुळे वाराणसीमधील सिगरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अनुरागने म्हटले, मी सायबर सेलमध्ये याची तक्रार दाखल करणार आहे. अनुरागने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे अनुरागने म्हटले आहे.

सोमवारी सायंकाळपर्यंत दिल्ली पोलिसावर बंदूक रोखणाऱ्या
मोहम्मद शाहरूखला ताब्यात घेण्यात आले आहे.

निष्कर्ष

दिल्लीच्या जाफराबाद मध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव शाहरुख आहे. सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने अनुराग मिश्रा नावाच्या व्यक्तीचा फेसबुक प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment