[ad_1]
पत्रकार राणा अयुब यांनी एक फोटो ट्विट केला होता. या फोटोत अनेक लोकांनी कोंबडा केल्याचे दिसत होते. राणा अयुब यांनी या फोटोसोबत लिहिले की, देशात लॉकडाऊननंतर आपल्या घरी परत जाणाऱ्या गरीब मजुरांना पोलिसांकडून अशी शिक्षा दिली जात आहे.
या ठिकाणी पाहा अयुब यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट

या ट्विटनंतर अनेक अन्य ट्विटर युजर्संनी हा फोटो याच दाव्यासह शेअर केला.

जर्नलिस्ट अभिसार शर्मा यांनीही हा फोटो एका व्हिडिओत शेअर केला. हा व्हिडिओ ३० मार्च रोजी NewsClickin नावाच्या यूट्यूब अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता.
व्हिडिओत १२: ३१ मिनिटावर हा फोटो पाहू शकता.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अधिकृत ट्वटिर हँडलवरूनही हा फोटो याच दाव्यासह शेअर करण्यात आला.

खरं काय आहे?
या फोटोत दिसत असलेले मजूर नाहीत. तर लॉकडाऊनचे कायदे मोडणारे लोक आहेत. ज्यांनी पोलिसांनी सांगूनही कायदा पाळला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कोंबडा बनवले आहे.
कशी केली पडताळणी?
या फोटोला गुगलवर रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला खरा फोटो २५ मार्च २०२० रोजीचा एबीपी न्यूजची एक
बातमी मिळाली.
या बातमीचे शीर्षक ‘IN PICS: Cops Shame Those Violating Lockdown By Making Them Do Sit-Ups And Hold Ears’होते. यात देशात वेगवेगळ्या भागात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ही शिक्षा सुनावली होती.
खरं म्हणजे, हा फोटो २४ मार्च रोजी काढला होता. त्यासाठी न्यूज एजन्सी पीटीआयला क्रेडिट दिले होते.
या फोटोसोबत कॅप्शन लिहिले होते, कानपूरः करोना व्हायरसमुळे लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवल्याने कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्यानंतर कानपूरच्या चकेरी परिसरात पोलिसांनी या लोकांना शिक्षा ठोठावली.
निष्कर्ष
करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा दिल्यानंतर हा फोटो चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. गरीब मजुरांना पोलिसांकडून शिक्षा दिली जात नाही, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
[ad_2]
Source link
Mong bạn tiếp tục chia sẻ thêm những nội dung như thế này.