Fact Check : Fact Check: पालघर लिंचिंगच्या आरोपींना हे दाम्पत्य वाचवत नाही. फोटो TISS च्या दोन प्राध्यापकांचा आहे – fact check: photo of tiss professors shared saying they are trying to get bail for the accused of palghar lynching

[ad_1]

दावा

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात साधुंच्या हत्येवरून आता आणखी एक फेक न्यूज सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. फेसबुक आणि ट्विटरवर एक महिला आणि एका पुरुषाचा फोटो या दाव्यासोबत शेअर केला जात आहे. की, हे दोघे पती-पत्नी साधुंची हत्या करणाऱ्या आरोपींचा जामीन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

या दाव्याच्या माहितीनुसार, त्यांचे नाव प्रदीप प्रभू उर्फ पीटर डिमेलो आणि सिराज बलसारा आहे. पोलीस गुन्हेगारांना टॉर्चर करू नये यासाठी हे खास ध्यान ठेवत आहेत.

फोटो या दाव्यासह शेअर करीत असलेल्या काही पोस्ट पाहा

खरं काय आहे ?

हा फोटो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील प्रसिद्ध प्राध्यापक आणि डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर यांचा आहे.

कशी केली पडताळणी ?

गुगलवर संबंधित की वर्ड्स सर्च केल्यानंतर आम्हाला २६ एप्रिल २०२० रोजी छापलेल्या The Hindu च्या एका न्यूजच्या बातमीची लिंक मिळाली. या बातमीचे शीर्षक
‘Palghar lynching: TISS professors caught in midst of fake news‘होते.

या बातमीनुसार, TISS च्या वेबसाइटवर फॅकल्टी टॅबमध्ये प्राध्यापक
जयशंक के. पी आणि प्राध्यापक
अंजली मॉन्टेरो यांची प्रोफाईल शोधली.

या माहितीनुसार, हे दोघेही मुंबई कॅम्पसमध्ये शिकवत आहेत.

दोघांनीही सोबत अनेक डॉक्युमेंट्री बनवली आहे. त्यांच्याविषयी तुम्ही
या ठिकाणी वाचू शकता.

व्हायरल फोटोला रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला २००७ मध्ये छापलेल्या एका ब्लॉगची लिंक मिळाली. हा ब्लॉग एका चित्रपट
‘Our Family‘ वर लिहिलेला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक के. पी. जयशंकर आणि अंजली मॉन्टेरो यांनी केले होते. या ‘About the Directors’ सेक्शनमध्ये हाच फोटो आहे. जो आता शेअर केला जात आहे.

निष्कर्ष

पालघर जिल्ह्यातील लिंचिंग आरोपींना जामिनासाठी दोन लोक प्रयत्न करीत असल्याचा दावा करीत जो फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. तो फोटो खरं म्हणजे TISS मधील प्राध्यापकांचा आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.



[ad_2]

Source link

Leave a comment