Fact Check : Fact Check: पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याआधी COVID-19 टास्कफोर्सचा सल्ला घेत नाहीत? – fact check: pm modi consulted covid task force before extending lockdown

[ad_1]

दावा

न्यूज मॅगझीन
The Caravan ने एक रिपोर्ट छापली आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान मोदी यांच्या प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याआधी ICMR ने बनवलेल्या COVID-19 टास्कफोर्सचा सल्ला मसलत केले नाही.

रिपोर्ट विद्या कृष्णन यांची होती. यात तज्ज्ञांच्या एका गटातील ४ सदस्यांचा आधार घेत हा दावा केला होता की, करोना व्हायरसच्या महामारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देण्यासाठी २१ सदस्य असलेली नॅशनल टास्क फोर्स बनवण्यात आली आहे. यात देशभरातील सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांचा समावेश आहे. परंतु, लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेआधी या टीमसोबत आठवड्यात एकही बैठक झाली नाही.

खरं काय आहे?

ICMRच्या अधिकृत ट्विटर हँडलने हा दावा फेटाळला आहे. ICMR ने आपल्या ट्विटमध्ये या दाव्या संदर्भात लिहिलेय, एका मीडिया रिपोर्टमध्ये COVID-19 टास्कफोर्सवरून एक दावा केला आहे. पण, खरं म्हणजे, महिन्याभरात टास्क फोर्सची १४ वेळा बैठक झाली होती. तसेच सर्व निर्णयात टास्क फोर्सच्या सदस्यांचा सहभाग होता. कृपया अशा बातम्यापासून सावध राहा.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ICMRच्या वर दिलेल्या ट्विटला कोट करीत मीडिया रिपोर्ट्सचे खंडन केले आहे.

ट्विटमध्ये लिहिलेय, एका न्यूज मॅग्झीनने दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेआधी २१ सदस्य असलेल्या टास्कफोर्सचा सल्ला घेतला नाही. त्यांच्याशी चर्चा केली नाही. खरं म्हणजे, हे सर्व निर्णय टास्कफोर्सशी चर्चा केल्यानंतर घेतले गेलेले आहे.



[ad_2]

Source link

2 thoughts on “Fact Check : Fact Check: पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याआधी COVID-19 टास्कफोर्सचा सल्ला घेत नाहीत? – fact check: pm modi consulted covid task force before extending lockdown”

Leave a comment