facebook messenger rooms: फेसबुकवरून आता एकाचवेळी करा ५० जणांना व्हिडिओ कॉलिंग – facebook messenger rooms now live with free video calls for up to 50 people

[ad_1]

नवी दिल्लीः फेसबुकने मेसेंजर रुम्स फीचरला लाइव्ह केले आहे. त्यामुळे आता कोणीही फेसबुक मेसेंजरवरून एकाचवेळी ५० लोकांसोबत व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग करू शकणार आहे. फेसबुकने मेसेंजरमधील या फीचरला गेल्या महिन्यात लाँच केले होते. परंतु, आता हे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मेसेंजर रुम व्हिडिओ कॉलिंगमध्ये कोणीही केवळ एक इनव्हाईट लिंकवरून यात सहभागी होऊ शकतो. जर तुम्ही फेसबुक वापरत नसाल तरीही या व्हिडिओ कॉलिंग कॉन्फ्रेंसिगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.


वाचाःशाओमी व आयफोनला मागे टाकले, सॅमसंगच्या ‘या’ फोनची जगात सर्वाधिक विक्री

मेसेंजर रुममध्ये सुद्धा झूम अॅप प्रमाणे फीचर्स देण्यात आले आहेत. फेसबुक मेसेंजर रुममध्ये आग्युमेंट रियलिटी इफेक्ट्स सुद्धा मिळणार आहे. तसेच क्रिएटर जवळ याचा पर्याय असेल की, कोणाला ते दाखवायचे किंवा कोणाला ज्वॉईन करून घ्यायचे. तसेच ती व्यक्ती कोणालाही कधीही रिमूव्ह करू शकते.

मेसेंजरमध्ये रुम कसे क्रिएट करायचे ?

ज्याप्रमाणे तुम्ही फेसबुक मेसेंजरवर रुम बनवता त्याप्रमाणे तुम्हाला फेसबुक मेसेंजरवर ग्रुप बनवावे लागेल. जर फेसबुक मेसेंजरमध्ये जाऊन लोकांना व्हिडिओ कॉलिंग करायची असल्यास सर्वात आधी फेसबुक मेसेंजर अॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर चॅटिंगमध्ये जावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला खाली पिपल हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर सर्वात वर Creat a Room दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही रूम बनवू शकाल.

व्हॉट्सअॅप वेबमध्ये मिळणाऱ्या रुमचा शॉर्टकट?

फेसबुकने रुम फीचरला व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉपमध्ये शॉर्टकट बटनला रुम देण्याची तयारी केली आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅप वेबमध्ये एक क्लिक केल्यानंतर युजर्संना मेसेंजर रुममध्ये जाता येणार आहे. तेथून व्हिडिओ कॉलिंग करू शकणार आहेत. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. फेसबुकने नुकतेच व्हॉट्सअॅपमधील व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवून ८ केली आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर एकाचवेळी आठ लोकांसोबत व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग करता येते.

वाचाः Samsung Galaxy A11, Galaxy A31 लाँच, पाहा किंमत-वैशिष्ट्ये

वाचाः सॅमसंग गॅलेक्सी A21s क्वॉड कॅमेऱ्यासह लाँच, पाहा किंमत-फीचर्स

वाचाः Jio, Airtel, Vodafone: फेक कॉल-SMS असे ब्लॉक करा

वाचाःGoqii Vital 3.0 स्मार्टबँड भारतात लाँच, शरीराचे तापमान सांगणार

[ad_2]

Source link

Leave a comment