[ad_1]
फेसबुकचे कार्यालय ६ जुलै रोजी उघडणार आहेत. परंतु, करोनाचा धोका लक्षात घेता कर्मचाऱ्यांना डिसेंबर पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या दरम्यान गरजेचे काम असेल तर कर्चमाऱ्यांना कार्यालयात बोलावले जाणार आहे. फेसबुकचे कर्मचारी आपले काम वर्क फ्रॉम होम कायम ठेऊ शकतात. कर्मचाऱ्यांना डिसेंबर पर्यंत तशी सुविधा देण्यात आल्याची माहिती फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. अल्फाबेट सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले की, ज्या कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे. त्या कर्चमाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे. पण, ज्या कर्मचाऱ्यांना ऑफिसात आल्याशिवाय त्यांचे काम होत नाही. त्या कर्चमाऱ्यांनी ऑफिसात आले तरी चालेल. ते कर्मचारी जुलैपासून ऑफिसात येऊ शकतात.
वाचाःशाओमीचा १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा Mi 10 5G लाँच, पाहा किंमत
सुंदर पिचाई यांनी काही दिवसांपूर्वी गुगलच्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, खूप दिवसांपासून घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसात येणे म्हणजे थोडे अवघडल्यासारखे होईल. परंतु, हे जून पर्यंत शक्य नाही. पिचाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष सल्ला दिला दिला आहे. स्वतः आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसात येण्याची गरज नाही. जे लोक ऑफिसात येतील त्यांच्यासाठी गाईडलाईन वेगळी आहे. गुगलने सर्वात आधी आपल्या कर्चमाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली होती.
[ad_2]
Source link