इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 42

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 42

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 


कृतिपत्रिका 26

समजून घेऊ या विश्व म्हणजे काय ?, दीर्घिका व तारे

संदर्भ इयत्ता सहावी प्रकरण 16 विश्वाचे अंतरंग

अध्ययन निष्पत्ती :

1) विश्वातील विविध घटक जसे तारे, ग्रह उपग्रह यांचे निरीक्षण करून त्यांचा तुलनात्मक अभ्यास करतात.

2) इंटरनेट, माहिती संप्रेषणाची विविध साधने व तंत्रे वापरून विविध संकल्पना प्रक्रिया यांची माहिती घेतात. लक्षात घेऊ या

• निरभ्र काळोख्या रात्री आकाशाचे निरीक्षण केल्यास तुम्हाला आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा दिसेल. हीच आपली ‘आकाशगंगा’ होय. तिला ‘ मंदाकिनी’ असेही म्हणतात.

• असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका’ म्हणतात.

आपली सूर्यमाला आकाशगंगा’ या दीर्घिकेत आहे. अशा असंख्य दीर्घिका, त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वात होतो.

• आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच हजारो पटीने मोठे असे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूंचे ढग, मृत तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत.

दीर्घिकांच्या आकारावरून त्यांचे विविध प्रकार ओळखले जातात.

• सूर्य सदृश्य तारे हे तारे तांबूस, विळ्या रंगाचे असतात. उदा. मित्र, व्याध इ.

• तांबडे राक्षसी तारे या तान्यांची तापमान 3000 °C ते 4000°C या मर्यादेतच असते. तेजस्विता सूर्याच्या 100 पट असू शकते. यांचा रंग तांबडा असतो.

• महाराक्षसी तारे हे तांबड्या राक्षसी ताऱ्यांच्यापेक्षाही मोठे व तेजस्वी असतात. तापमान 3000°C ते 4000°C या मर्यादेतच असते. परंतु त्यांचा व्यास मात्र सूर्यापेक्षाही शेकडो पट जास्त असतो.

जोड तारे आकाशातील निम्म्यापेक्षा जास्त तारे हे जोड तारे आहेत. याचा अर्थ दोन तारे परस्परांभोवती भ्रमण करत असतात. काही वेळा तीन किंवा चार तारेही असतात.

रूपविकारी तारे या तात्यांची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही. त्यांचे सतत आकुंचन प्रसरण होत असते तारा प्रसरण पावला, की तो कमी ऊर्जा उत्सर्जित करतो. तेव्हा ताऱ्याचे तेज कमी होते. याउलट तान्याचे आकुंचन झाले, की त्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो. त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसतो. उदा. ध्रुवतारा

सराव करू या.

1) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

a) आपली सूर्यमाला कोणत्या दीर्घिकत आहे?

b) आकाशगंगा या दीर्घिकेचे दुसरे नाव कोणते आहे?

(c) दीर्घिकांचे चार प्रकार लिहा.

2) काळोख्या रात्री आकाश निरीक्षण करा. आकाशात तारे व ग्रह यांचे निरीक्षण करा. कोणकोणत्या रंगाचे तारे तुम्हाला पाहायला मिळाले? त्याची वहीत नोंद करा.

3) काळोख्या रात्री निरभ्र आकाशाचे चित्र काढा.

4) निरभ्र अंधाऱ्या रात्री उत्तर दिशेला तेजस्वी असा ध्रुवतारा दिसतो. त्याचे निरीक्षण करा.

5) मोठ्या व्यक्तींकडून (आजी, आजोबा) ताऱ्यांच्या ग्रहांच्या गोष्टी ऐका.

6) आकाश दर्शनाची, ग्रहतान्यांची माहिती असलेल्या पुस्तकांचे वाचन करा.


4. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment