♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 39

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 39

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका 23

समजून घेऊ या छाया निर्मिती

संदर्भ: इयत्ता सहावी पाठ 14 प्रकाश व छायानिर्मिती

अध्ययन निष्पनी परिसरातील साहित्य पापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करता ह

कॅमेरा, परिदर्शक, विजेरी इत्यादी.

लक्षात घेऊ या

छाया निर्मिती कोणत्याही वस्तूची अथवा सजीवाची सावली म्हणने छाया होय. D

खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे कृती करा व छाया निर्मिती कशी होते ते पहा. एक बिजेरी घ्या. भिंतीवर विजेरीचा प्रकाशझोत टाका.

आता तुमच्या मित्राला विजेरी आणि भिंतीच्या मध्ये उभे करा. काय घडते में पड़ा मित्राची सावली पृष्ठभागावर म्हणजेच भिंतीवर पडलेली दिसते. सावली म्हणजेच छाया होय. विजेरीचा प्रकाश मित्रावर पडला म्हणजेच अपारदर्शक पस्तूवर पडला आणि मग त्याची भिंतीबर छाया पडलेली आपल्याला दिसून येते.

प्रकाश खोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली, तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तूपलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते. या सावलीलाथ त्या वस्तूची छाम्हण

एखाया वस्तू मधून प्रकाश आरपार जात नाही तेव्हाच त्या वस्तूची छाया निर्माण होते. छायेचे स्वरूप प्रकाशाचा

सोत, वस्तू आणि पडदा यांच्या परस्परांमधील अंतर व दिशेवर अवलंबून असते.

कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे पडणारी छाया सकाळी आणि संध्याकाळी लांब असते व छोटी असते. छायेमध्ये होणारा बदल हा प्रकाशाचा स्रोत, वस्तू व छाया कशावर पडणार आहे यांवर अवलंबून असतो. त्याने चालताना झाडांचे निरीक्षण केले, तर हे बदल सहजासहजी आपल्या लक्षात येतात. रात्रीच्या वेळी आपल्याला दिसणान्या सावल्या / छाया पाहून घाबरून जाऊ नये कारण त्यामागे सोपे विज्ञान असते..

सराव करुया:

1) एका मोठ्या खोलीत तुमच्या मित्राला तुमच्या पासून एका ठराविक अंतरावर उभे करा व दिजेरी वापरून तुमच्या मित्राची छाया भिंतीवर पाडा. आता पुढील काही कृती करा. छायेमध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा व छाया कशी दिसली याची नोंद करा.

अ) मित्राला भिंतीच्या जवळ पाठवा.

आ) मित्राला तुमच्या जवळ बोलवा.

इ) आता तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन परत जवळ या.

ई) तुमच्या हातातील विजेरी उंच धरा मग खाली धरा.

ए) मित्राच्या डाव्या उजव्या बाजूस जा. छाया कोठे दिसते ते लिहा.

(2) छाया निर्मितीच्या आधारे आपले हात, पाय यांच्या साह्याने पक्षी, प्राणी यांचे वेगवेगळे आकार तयार करा.

3) काचेचा पेला, पाणी व मोठा पांढरा कागद घ्या. खिडकीत सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवा. कागदावर काय दिसते ते लिहा.

4) एक तार गोलाकार वाकवून साबणाच्या पाण्यात बुडवून त्यावर फुंकर मारली तर फुगे तयार होतात. त्या फुग्यांमध्ये काय दिसेल?

5) छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात असे तुला वाटते?


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी