इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 34

इ 7 वी  सेतू अभ्यास दिवस 34

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका : 18

समजून घेऊ या उर्जेची रूपे, प्रकाश ऊर्जा, ध्वनि ऊर्जा, रासायनिक ऊर्जा

संदर्भ: इयत्ता सहावी प्रकरण 11 कार्य आणि ऊर्जा

अध्ययन निष्पत्ती : प्रक्रिया व घटना स्पष्ट करतात. उदा. उज्जेंची रूपे, रचना, उपलब्ध स्त्रोतांचा वापर, नियोजन ई. बाबींमध्ये सर्जनशीलता प्रदर्शित करतात.

लक्षात घेऊ या :

प्रकाश ऊर्जा :

सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती आपले अन्न तयार करतात म्हणजे प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण अन्नातील रासायनिक उर्जेत होते. या ऊर्जेचा वापर वनस्पती आणि प्राणी त्यांची कामे करण्यासाठी करतात म्हणजे प्रकाश है ऊर्जेचे रूप आहे.

ध्वनी ऊर्जा :

मौठया आवाजामुळे खिडकांच्या काचांना तडे गेलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचप्रमाणे खेळण्यातील काही मोटारींची हालचाल नियंत्रित करण्यासाठी ध्वनीचा वापर केला जातो, म्हणजेच ध्वनीमुळे काही कार्ये होतात यावरून ध्वनी हे एक उर्जेचे रूप आहे हे आपणास समजते. रासायनिक ऊर्जा :

लाकूड जळू लागले की उष्णता व प्रकाश मिळतो. काही वेळा जळण्याचा आवाजही होतो, कारण लाकडात साठलेली ऊर्जा वेगवेगळ्या रुपात बाहेर पडते. लेड ॲसिड बॅटरीमध्ये होणा-या रासायनिक क्रियेचे विद्युत ऊर्जा निर्माण होते. रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा म्हणतात.

सराव करू या :

प्रश्न 1. दिवाळीमधे तुम्ही जे फटाके फोड़ता त्यात कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवलेली असते ?

प्रश्न 2. उदाहरण दया.

प्रकाश ऊर्जा

ध्वनी ऊर्जा

रासायनिक ऊर्जा

प्रश्न 3. आपल्या घरात, परिसरात कोणकोणत्या ऊर्जेची उदाहरणे तुम्हाला बघायला मिळतात? आपल्या मित्रांशी चर्चा करून लिहा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment