इ 7 वी सेतू अभ्यास दिवस 31
विषय – विज्ञान कृतिपत्रिका
कृतिपत्रिका : 15
समजून घेऊ या बलाचे प्रकार, घर्षण बल, स्थितिक विद्युत बल व एकत्रित बले. संदर्भ: इयत्ता सहावी, प्रकरण-10 बल आणि बलाचे प्रकार अध्ययन निष्पत्ती : जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात.
लक्षात घेऊ या :
घर्षण बल :
घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. जेव्हा दोन पृष्ठ भागांमध्ये घर्षण होते तेव्हा त्यामध्ये गती ही कमी होत असते. गुळगुळीत पृष्ठभाग यांमध्ये घर्षण बल कमी असते तर खडबडीत पृष्ठभाग यामध्ये घर्षण बल हे जास्त असते.

स्थितिक विद्युत बत्न :
घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबीनाईट या सारख्या पदार्थावर विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युतभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला ‘स्थितिक विद्युत बल’ असे म्हणतात.
एकत्रित बले
एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात त्याला
‘एकत्रित’ बले असे म्हणतात.
सराव करूया :
- एका टेबलवर कागदाचे कपटे पसरा व प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून त्याला कागदाच्या कपट्यांजवळ आणा, काय होते ते बघा व त्यामागील कारण शोधा.
- रेल्वेस्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो, असे का ?
3 यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते, असे का?
Thông tin đầy đủ, không vòng vo.