♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 32

इ 6 वी  सेतू अभ्यास दिवस 32

विषय  – विज्ञान कृतिपत्रिका 

कृतिपत्रिका : 19

समजून घेऊया : श्वसन, अन्ननलिका, रक्ताभिसरण आणि चेतासंस्था संदर्भ : इयत्ता पाचवी, पाठ क्रमांक 21. कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिये.

अध्ययन निष्पत्ती : 1. प्राण्यामधील असाधारण क्षमता (दृष्टी, गंध, ऐकणे निद्रा, आवाज इत्यादी) व त्यांचे प्रकाश आवाज व अन्न यांना प्रतिसाद देतात.. निरीक्षणे अनुभव माहिती याची सुनियोजित पद्धतीने नोंदी करतात.

लक्षात घेऊया:

श्वसन:

जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तीनही गोष्टींची गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते. त्यासाठी आपला श्वासोच्छ्वास सतत चालू असतो. आपल्या शरीरात श्वासोच्छ्वासाचे काम करणारी इंद्रिये आहेत. श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते. श्वासनलिकेच्या दोन शाखांमार्फत हवा फुप्फुसांत शिरते. फुप्फुसात या दोन्ही शाखांपासून अनेक शाखा फुटतात. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. त्या पिशव्यांना वायुकोश म्हणतात. उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचिक पडदयासारखा अवयव असतो. त्याला श्वासपटल म्हणतात.

श्वासपटल व त्याची हालचाल :

श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखांतून पुढे वायुकोशात भरते. श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छ्वासावाटे हवा बाहेर टाकली जाते. वायूंची देवाणघेवाण वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीकबारीक रक्तवाहिन्यांत जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागांत वाहून नेला जातो.. अन्ननलिका

आपण खातो त्या अन्नाचे शरीरात पचन होते. म्हणजेच अन्नापासून रक्तात मिसळू शकणारे पदार्थ तयार होतात. हे काम आपल्या शरीरातील एका अतिशय लवचीक व लांबच लांब बळीच्या विविध भागांमध्ये पार पडते. या नळीला अन्ननलिका म्हणतात. या नळीचे वरचे टोक म्हणजे आपले तोंड आणि खालचे टोक म्हणजे गुदद्वार. तोंडापासून गुदद्वारापर्यंत एकच नळी जात असली तरी या नळीचा आकार सर्व भागांत एकसारखा नसतो. अन्ननलिकेच्या वेगवेगळ्या भागांची रचना व कार्ये वेगवेगळे असते.

पचनेंद्रिये

अन्न तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची सुरुवात होते. तोंडातील दात, जीभ आणि लाळ या सर्वांच्या क्रियांमुळे अन्नाचा गिळता येईल असा, ओलसर मऊ गोळा तयार होतो. तो आपण सहज मिळतो. गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जाते. जठर है पिशवीसारखे इंद्रिय आहे. यात अन्न घुसळले जाते. जठरातील पाचक रसांमुळे काही पचनक्रिया घडतात आणि अन्नातील काही रोगजंतू नष्ट होतात. येथे अन्नाचे एका पातळ खिरीसारख्या पदार्थात रुपांतर होते. ते पुढे लहान आतड्यात ढकलले जाते. प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे सात मीटर लांबीचे असते. आतड्यातील पाचकरसामुळे अन्नपचनातील

अनेक क्रिया येथे होतात. येथे काही ग्रंथींच्या स्रावांची पचनास मदत होते. पंचनातून शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात व रक्तात शोषले जातात. उरलेले पदार्थ मोठ्या आतड्यात जातात. प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे सुमारे दीड मीटर लांबीचे असते. उरलेल्या पदार्थात असलेले बरेचसे पाणी येथे शरीरात शोषले जाते आणि विष्ठा तयार होते. ती मलाशयात जमा होते. मलाशयात विष्ठा म्हणजे मल काही काळ साठून राहते. नंतर गुदद्वारातून विष्ठा शरीराबाहेर टाकली जाते. रक्ताभिसरण चेतासंस्था

श्वासपटल, हृदय, पचनसंस्था यांची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात, की आपल्या कळत नकळत ती रात्रंदिवस चालू राहायला हवी असतात. काही कामे आपण आपल्या इच्छेप्रमाणे हवी तेव्हा करतो. उदाहरणार्थ, बोलणे, धावणे, अभ्यास करणे, खेळणे. या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला समन्वय साधणे असे म्हणतात हे तुम्ही शिकला आहात. असा समन्वय साधण्याचे काम मेंदूचे असते. मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो. त्यासाठी ते एकमेकांना संदेशवहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. त्यांना ‘चेतातंतू’ म्हणतात. मेंदू आणि चेतातंतूचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था म्हणतात. चेतासंस्था शरीरामध्ये समन्वय राखण्याचे कार्य करते.

सराव करु याः

1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

अ. तोंडातील प्रत्येक दातावर…………………नावाच्या पदार्थाचे आवरण असते.

ब. प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे…………….मीटर लांबीची असते.

क. विशिष्ट द्रव स्रवणारे इंद्रिय म्हणजे…………….होय.

2. खालील चित्र ओळखून इंद्रियाचे नाव व प्रत्येक इंद्रियाचे कार्य लिहा.

3. वेगळा शब्द ओळखा. कारण लिहा

अ. नाक, फुफ्फुसे, हृदय, श्वासनलिका, श्वासपटल.

ब. तोंड, ग्रासिका, जठर, चेतातंतू, मलाशय

4. खालील वाईट सवयी चे मानवी आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात?

अ. धुम्रपान

ब. मद्यपान:

5. विचार करा व लिहा. जेव्हा आपण बऱ्याच काळासाठी काहीही खाल्ले नाही.

6. तुम्ही कधी कधी तुमच्या पोटात गडगड आणि त्रासदायक आवाज ऐकला आहे? असे कधी होते?

7. बरेच पालक जेवताना मुलांना बोलू नका असे सांगतात. आपण खाण्याच्या दरम्यान बोललो तर काय होईल?


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी