♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 38

इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 38

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका 22 संदेशवहनाची

संदर्भ इयत्ता चौथी, प्रकरण 22, वाहतूक व संदेशवहन साधने व त्यांचे फायदे

अध्ययन निष्पत्ती : भूतकाळातील आणि सध्याच्या वस्तू आणि कृती यामधील फरक सांगतात. (उदा. परिवहन, चलन, घरे, साहित्य, साधने, कौशल्य इ.)

लक्षात घेऊया :

वाहतुकीची साधने (जुनी व आधुनिक)

वाहतूक म्हणजे काय आपल्याला माहीत आहे? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा प्रवास करणे म्हणजे वाहतूक. मग ती वाहतूक वस्तूची असेल किंवा आपली! आता मुलांनो, चित्रातील साधनांचे निरीक्षण करा. ही साधने कशाची आहेत? ती आपण वापरतो का? सर्वच साधने वापरतो का? ही साधने कोणत्या काळातील आहेत? त्याबाबत शिक्षक मुलांशी चर्चा घडवून आणतील.

वरील चित्रातून तुम्हाला काय लक्षात येते, तर ही वाहतुकीची साधने असून, ती वेगवेगळ्या काळात आपण वाहतुकीसाठी आपण वापरली आहेत. यामध्ये जुनी आणि आधुनिक साधने येतात. मग बैलगाडी, घोडागाडी, पालखी / डोली तर कधी माणूस व प्राणी यांचा वाहतुकीसाठी वापर पूर्वी होत असे हीच जुनी साधने तर आता आधुनिक काळात वाहतुकीची अत्याधुनिक साधने निर्माण झाली. उदा. आगगाडी, विमान, जहाज, रॉकेट, मेट्रो इ.

संदेशवहन साधने (जुनी व आधुनिक)

संदेशवहन म्हणजे काय? तुम्ही संदेश, विरोपासाठी कशाचा वापर करता? आता पुढील चित्रातील साधनांचे निरीक्षण करा आणि सांगा ही साधने कशाची आहेत? ही साधने कोठे आणि कशासाठी वापरली जातात, तुमच्या घरी ह्यातील कोणत्या साधनांचा वापर केला जातो ?

तुम्ही ह्या चित्रांचे निरीक्षण केले असता ही साधने आहेत संदेशवहनाची! हे लक्षात येते. तर विविध प्रकारची माहिती मिळवणे किंवा माहिती पोहचविणे म्हणजे संदेशवहन काही शतकांपूर्वी कबुतराच्या पायात चिठ्ठी बांधून संदेश पाठविले जायचे. नंतर निरोप्याला पाठवून संदेशवहन होत असे. त्यानंतर तार व टपालसेवा सुरु झाली. ही संदेशवहनाची जुनी (पूर्वीची) साधने होत. अलीकडच्या काळात संदेशवहनासाठी जलद तंत्रांचा वापर होऊ लागला. आणि तो सर्वच क्षेत्रांत होऊ लागला. रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल फोन, इ. यामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तके, दूरदर्शन, इंटरनेट ही सार्वजनिक संदेशवहनाची साधने आहेत.

वाहतूक व संदेशवहन साधनांचे महत्व –

पूर्वीच्या वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत आधुनिक साधने जास्त वेगवान आणि सुरक्षित आहेत. त्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होऊ लागली. प्रवास (वाहतूक) जलद होणे सुलभ झाले.

संदेशवहनाची पूर्वीची साधने त्यावेळी जरी महत्वाची वाटत होती, ती आता संथ वाटू लागली. कारण आताच्या आधुनिक साधनांमुळे संदेशवहन कमी वेळेत व जलद (एका क्षणात) होऊ लागले. जगात कोठेही निरोप पोहचविणे सुलभ झाले, ते आधुनिक संदेशवहनाने! त्यामुळे वाहतूक आणि संदेशवहन साधनांमध्ये काळानुरूप बदल होत गेले आणि त्याचे महत्त्व दैनंदिन जीवनात वाढून ती आपली गरज झाली हे महत्वाचे. परंतु वाहतुकीची अथवा संदेशवहनाची साधने गरजेनुसार वापरण्यासाठी असतात. त्यांचा अतिवापर, आपल्यासह सर्व सजीवांसाठी व पर्यावरणासाठी हानिकारकच !

सराव करू या :

प्र. 1) गटातील वेगळा पर्याय ओळखा.

अ) दूरदर्शन, इंटरनेट, रेडिओ, पुस्तके

ब) मानव, प्राणी, बैलगाडी, रॉकेट

प्र. 2) परस्परसंबंध लिहा.

दुर्गम भाग याक: वाळवंट :

प्र. 3) काय करावे ते लिहा.

अ) मधूला अतिशय महत्वाचा संदेश परगावी त्वरीत पाठवायचा आहे, त्यासाठी तिने कोणत्या साधनांचा वापर करावा?

4. विषय – परिसर अभ्यासकृतिपत्रिका

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  / विज्ञान कृतिपत्रिका याचा अभ्यास करण्यासाठी


Leave a comment