इ 5 वी आजचा सेतू अभ्यास दिवस 31
विषय – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास
खालील माहिती वाचा व समजून घ्या
कृतिपत्रिका : 15
समजून घेऊया महाराष्ट्र प्राकृतिक रचना, पिके व भाषा यातील विविधता
संदर्भ: इयत्ता चौथी प्रकरण 15, माझा जिल्हा माझे राज्य
अध्ययन निष्पत्ती :
1) आपला जिल्हा व राज्य यांची प्राकृतिक व मानवनिर्मित घटक या अनुसंधाने तुलना करतात.
2) नकाशात जिल्हे व राज्यानुसार प्रमुख खाधान्न पिके व प्रसिद्ध खाद्यपदार्थ दाखवतात.
लक्षात घेऊया :
महाराष्ट्र हे आपले राज्य आहे. या महाराष्ट्राचे प्राकृतिक रचनेनुसार तीन प्रमुख विभाग पडतात. किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर नागपूर ही उपराजधानी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, तर राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग असून त्यात अस्तंभा हे सर्वात उंच शिखर तर सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. यात कळसूबाई है। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. (ही प्राकृतिक रचना तुम्ही प. अ. अभ्यास-1 मधील पृष्ठ क्रमांक-94 वरील महाराष्ट्र राज्य प्राकृतिक बकाशा आहे ती अभ्यासून पहा.)
पिके व भाषा यातील विविधता
महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये जशी विविधता आहे, तशी विविधता पिकांमध्ये व भाषेमध्ये सुद्धा दिसते. महाराष्ट्र राज्य जास्त, मध्यम व कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यानुसार येथे विविध पिके पिकतात. शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते, कमी-जास्त पावसामुळे येथे पिकांच्या बाबतीत विविधता आढळते. शेती हा महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय आहे. येथे पावसाच्या प्रदेशानुसार पुढील पिके घेतली जातात. यासाठी पृष्ठ क्रमांक-95 महाराष्ट्र राज्य वार्षिक पर्जन्यमान हा नकाशा अभ्यासा.) पावसाचे प्रदेश व मुख्य पिके :

भाषेतील विविधता:
माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलती, आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहचवतो. एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रदेशांनुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात. त्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत येतात. आणि त्यामुळेच भारतातील राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारे झाली.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते. वेगवेगळ्या प्रदेशांत मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो, त्यामुळे राज्यात बोलीभाषेच्या बाबतीत विविधता दिसून येते. विविध प्रदेश व मराठीच्या काही बोली पुढीलप्रमाणे दिल्या आहेत. त्या अभ्यासा. तुमच्या परिसरात कोणत्या बोलीभाषा बोलल्या जातात या बाबत माहिती घ्या.

आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी असली तरी, आपल्या राज्यात विविध भागात प्रदेशात विविध बोलीभाषा बोलल्या जातात. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या विविध भागात आदिवासी जमातीचे लोक राहतात त्यांच्या बोलीभाषेत पण विविधता आहे.
सराव करू या :
प्र. 1) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) किनारपट्टीच्या प्रदेशात कोणते जिल्हे येतात, ते नकाशा पाहून लिहा.
ब) तुमच्या परिसरातील बोलीभाषेतील काही शब्द/वाक्य लिहा.
प्र. 2) खालील विधाने दुरुस्त करून लिहा.
अ) नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
ब) राज्याच्या उत्तरेस अरबी समुद्र आहे.
प्र. 3) दिलेल्या जिल्ह्यासमोर तेथील मराठी बोलीभाषा लिहा.
अ) सिंदुधुर्ग
ब) नागपूर
क) पुणे

