इ 4 थी आजचा सेतू अभ्यास दिवस 37

इ 4 थी  आजचा सेतू अभ्यास दिवस 37

विषय  – परिसर अभ्यास कृतिपत्रिका आजचा सेतू अभ्यास

कृतिपत्रिका : 21

समजून घेऊ या वयानुसार शरीरात होणारे बदल

संदर्भ इयत्ता 3 री, पाठ 23 वय जसजसे वाढते

अध्ययन विष्पत्ती प्राणी, पक्षी यांचे वैशिष्ट्ये यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदांचा वापर करून

गट तयार करतात.

लक्षात घेऊ या :

खालील चित्राचे निरीक्षण करा. खालील चित्रात चिंटू, त्याचे वडील व आजोबा दिसत आहेत.

चित्रात मुलगा, त्याचे वडील व आजोबा तुम्ही कसे ओळखाल ? चिंटू वयाने सर्वात लहान आहे. तर आजोबांचे वय सर्वात जास्त आहे. वयानुसार शरीरात बदल होत असतात.

बाळाचा जन्म झाल्यापासून ते हळूहळू मोठे होऊ लागते. त्याची ते वजन व उंची वाढू लागते. वयाच्या १८ वर्षापर्यंत शरीराची वाढ पूर्ण होते. त्यानंतर शरीरात वाढ होत नाही. मात्र आरोग्यानुसार वजन कमी जास्त होत असते. वय वर्षे ४० पर्यंत व्यक्तीचे आरोग्य उत्तम असते. या वयापर्यंत व्यक्ती तरुण असते. वयाच्या ४० व्या वर्षांनतरही शरीरात बदल होत असतात. केस पांढरे होतात व डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागते, त्यामुळे चष्मा लागतो.

वय जसे वाढत जाते तसे शरीरात ताकद कमी होते, दात पडतात, स्मरणशक्ती कमी होते व विविध आजार जडतात. याला म्हातारपण म्हणतात. शरीर हळूहळू काम करणे बंद करते व एक दिवस मृत्यू होतो. प्रत्येक सजीवाचा एक दिवस मृत्यू असतो.

माणसाप्रमाणेच प्रत्येक प्राणी व वनस्पती यांची सुद्धा जन्मापासून वाढ होत असते. शरीरात बदल होतात व शेवटी

म्हातारपणामुळे मृत्यू होतो,

सराव करू या :

  1. म्हातारपणामुळे त्वचेवर कोणता परिणाम होतो ? तुमची व तुमच्या आजी आजोबांची त्वचा याचे निरीक्षण करा. 2. लहान बाळाला काही आजार होऊ नये म्हणून लसी दिल्या जातात, लहान बाळाला कोणकोणत्या लसी देतात, याची माहिती मोठ्यांना विचारून लिहा.
  2. मोठ्यांना विचारून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. अगदी लहान बाळांना भात का भरवत नाहीत ? त्यांना कोणते अन्न देतात ?

ब. छोटी बाळे पालथी पडायला कधी सुरुवात होते ?

क. छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते ?

ड. छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात ?

  1. आपल्या शरीराची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण योग्य वयात योग्य आहार घेणे गरजेचे आहे, आपल्या

आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा ?

  1. उपक्रम कुंडीमध्ये वालाची एक बी लावा. बी पासून रोप कसे तयार होते व रोपाची वाढ कशी होते याचे निरीक्षण करा. केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवा.


5. विषय – परिसर अभ्यास 2 / इतिहास

सेतू अभ्यास विषय परिसर अभ्यास  २ / इतिहास याचा अभ्यास करण्यासाठी




Leave a comment