इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 44
विषय – इतिहास – भूगोल

पहिले काही आठवूया –
नागरी संस्कृती कशा उदयाला आल्या, हे माहिती आहे. नागरी संस्कृतीची नावे माहिती आहे.
मदत हवी आहे का ?
तुला काही आठवत नसेल तर घरातील सदस्यांशी चर्चा कर किंवा शिक्षकांसोबत दूरध्वनीवरून चर्चा कर.
करून पाहूयात
1 हडप्पा संस्कृतीतील नगररचनेचे चित्र काढ. किंवा घरातील टाकाऊ वस्तूंपासून प्रतिकृती तयार कर.
अध्ययन अनुभव / कृती
यापूर्वीच्या पाठात मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन व हडप्पा या नागरी संस्कृतींची माहिती पहिली आहे. या पाठात मेसोपोटेमिया संस्कृतीतील विविध उपसंस्कृतींची माहिती पाहू.
सुमेरियन, अक्केडियन, बॅबिलोनियन व असिरीयन या चार संस्कृती मेसोपोटेमियामध्ये अस्तित्वात होत्या. इसवी सनापूर्वी सुमारे २३५०च्या सुमाराला अक्कड चे साम्राज्य उदयाला आले. अक्कडचा सम्राट सार्गन याच्या काळात हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यातील व्यापार भरभराटीला आला होता. बॅबिलोनचा राजा हम्मुराबी इसवी सनापूर्वी १७९२ ते १७५० या काळात होऊन गेला. आपल्या प्रजेला लिखित स्वरूपात सुव्यवस्थित कायदा देणारा हा जगातील पहिला राजा होय.
प्राचीन इजिप्तमधील लोकांनी साध्य केलेल्या गोष्टींपैकी विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे वास्तुरचनेचे शास्त्र, इजिप्तमधील पिरॅमिड आणि मंदिरे यांच्या भव्यतेवरून त्याची साक्ष पटते. त्यांनी इमारती बांधण्यासाठी प्रामुख्याने मातीच्या कच्च्या विटा आणि दगड यांचा वापर केला. गणित, वैद्यक, सिंचन पद्धती या क्षेत्रांमध्ये त्यांनी खूप प्रगती केली होती. तेथे उत्तम जहाजे बांधली जात. निळ्या रंगाची झिलई दिलेल्या मातीच्या वस्तूंचे उत्पादन, पपायरस नावाच्या वनस्पती पासून कागद बनवण्याची कला अशा क्षेत्रातही तेथे विशेष प्रगती झाली होती.
हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांचे उत्खनन इ.स. १९२१ २२ मध्ये सुरू झाली आणि हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. हडप्पा येथील संस्कृती उत्खननात प्रथम उजेडात आली, म्हणून तिला

हडप्पा संस्कृती असे नाव दिले गेले.
सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यातील हडप्पा संस्कृतीचे लिपीत लिहिलेले लेख उपलब्ध असले तरी त्यांचे वाचन करण्यात अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे त्या लेखांचा उपयोग संस्कृतीचा इतिहास जाणून घेण्यासाठी करता येत नाही. मात्र हडप्पा संस्कृतीची स्वतःची एक विकसित लिपी होती आणि इतर नागरी संस्कृतीच्या काळात ती अस्तित्वात होती, हे लक्षात घेऊन संस्कृतींच्या काळाला भारतीय उपखंडाचा इतिहास पूर्वकाळ’ असे म्हटले जाते.
काय समजले ?
वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
या प्रश्नांची उत्तरे शोधू
विधान चूक कि बरोबर ते लिही.
१. हम्मुराबी राजाने प्रजेला लिखित कायदे दिले नाही.
२. इजिप्तमध्ये पपायरस वनस्पतीपासून कागद बनवला गेला.
३. हडप्पामध्ये भव्य पिरॅमिड उभारण्यात आले.
४. हडप्पा संस्कृतीची स्वतःची एक विकसित लिपी होती.
अधिक सराव करु –
खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. मेसोपोटेमियातील चार संस्कृती कोणत्या?
२. कोणत्या राजाच्या काळात लिखित कायदे तयार झाले?
३. इजिप्शियन लोकांनी कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती केली होती?
४. हडप्पा संस्कृतीतीला भारतीय उपखंडाचा इतिहासपूर्व काळ’ का म्हटले जाते?
5. विषय – हिंदी
सेतू अभ्यास विषय हिंदी याचा अभ्यास करण्यासाठी
Có thêm ví dụ minh họa thì càng tuyệt.